भारताच्या भेटीवर आलेले ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांच्याबरोबर चर्चेसाठीच्या शिष्टमंडळामध्ये संरक्षणमंत्री ए. के. ऍंटनी यांचा समावेश करण्यात आलेला नाही. वास्तविक कॅमेरुन यांच्याबरोबर संरक्षणविषयक करारांवर चर्चा होण्याची शक्यता असताना संरक्षणमंत्र्यांना त्यापासून दूर ठेवल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
ऍंटनी यांना पंतप्रधानांच्या शिष्टमंडळापासून का वगळण्यात आले, याचे काहीही कारण अद्याप देण्यात आलेले नाही. केवळ संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी संरक्षणमंत्री शिष्टमंडळाचा भाग नसल्याचे म्हटले आहे.
अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्यावरही ब्रिटनकडून माहिती मिळवण्यासाठी बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. भारतीय हवाई दलाला लढाऊ जातीची युरोफायटर विमाने हवी आहेत, त्यावरही यावेळी चर्चा होणार असल्याचे समजते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा