ब्रिटनच्या पाच उपग्रहांचे प्रक्षेपण केल्याच्या दोन दिवसांनंतर इस्रोचे महत्त्वाचे संकेतस्थळ हॅक झाल्याचे इस्रोची संलग्न संस्था अंतरिक्षने स्पष्ट केले आहे. या संकेतस्थळाचे फक्त पहिलेच पान हॅक करण्यात आले असून त्यावर संकेतस्थळ निर्माणाधीन असल्याचा संदेश देण्यात आला आहे.
इस्रोच्या अंतरिक्ष कॉपरेरेशन लि. या संस्थेचे हे संकेतस्थळ आहे. फक्त पहिल्याच पानावर हा संदेश आहे. उर्वरित पाने सुरळीत उघडत असल्याचे अंतरिक्षच्या अधिकाऱ्याने सांगितले.
‘अंतरिक्ष’ संस्था ही इस्रोसाठी विपणनाचे काम करते. या संस्थेच्या माध्यमातून इस्रो आपले तंत्रज्ञान व अंतराळात वापरली जाणारी यंत्रणा आदी गोष्टींची जगभरात विक्री केली जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा