चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारणारे अनुपम खेर हे वास्तविक आयुष्यातदेखील खलनायकच असल्याची टीका भाजप खासदार योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. मागील आठवड्यात ‘टेलिग्राफ’ने आयोजित केलेल्या चर्चासत्रात बोलताना अनुपम खेर यांनी योगी आदित्यनाथ आणि साध्वी प्राची यांच्यावर सडकून टीका केली होती. हे दोघेजणही मुर्खासारखे बोलतात , त्यांना भाजपमधून काढून टाकले पाहिजे, असे रोखठोक मत खेर यांनी व्यक्त केले होते. त्याबाबत योगी आदित्यनाथ यांना विचारले असता त्यांनी अनुपम खेर फक्त ‘रील लाईफ’मध्येच नव्हे तर, ‘रिअल लाईफ’मध्येही व्हिलन असल्याचे सांगत आपला राग व्यक्त केला.

Story img Loader