Anura Dissanayake Sri Lanka’s new President Marxist Leader : मार्क्सवादी नेते अनुरा कुमार दिसानायके रविवारी (२२ सप्टेंबर) श्रीलंकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाले. निवडणूक आयोगाने दुसऱ्या फेरीची मतमोजणी केल्यानंतर ५६ वर्षीय दिसानायके यांना विजयी घोषित केलं. ते मार्क्सवादी जनता विमुक्ती पेरामुना (जेव्हीपी) या पक्षाच्या नॅशनल पीपल्स पॉवर (एनपीपी) आघाडीचे नेते आहेत. दिसानायके यांनी समगी जन बलवेगया (एसजेबी) पक्षाचे नेते सजित प्रेमदासा यांचा पराभव केला. श्रीलंकेत ‘एकेडी’ नावाने परिचित असलेले दिसानायके आज (सोमवार, २३ सप्टेंबर) अध्यक्षपदाची शपथ घेतील. त्यांच्या रूपाने श्रीलंकेला पहिल्यांदाच मार्क्सवादी विचारसरणीचा अध्यक्ष मिळाला आहे.

भ्रष्टाचारविरोधी मोहीम आणि राजकीय संस्कृतीत बदल घडवण्याचे आश्वासन यामुळे तरुण मतदारांची दिसानायके यांना विशेष पसंती मिळाल्याचं निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झालं आहे. दिसानायके यांच्या एनपीपीला २०१९ च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत केवळ तीन टक्के मतं मिळाली होती. ते मूळचे उत्तर मध्य प्रांतातील ग्रामीण थंबुटेगामाचे रहिवासी आहेत. त्यांनी कोलंबोमधील केलनिया विद्यापीठातून विज्ञानात पदवीपर्यंत शिक्षण घेतले आहे.

What Devendra Fadnavis Said?
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसला सवाल, “उलेमांच्या मागण्या…”
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
ajasthan By-Election naresh meena assaults malpura SDM amit chaudhary
Rajasthan By-Election : अपक्ष उमेदवाराची उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना मारहाण, VIDEO व्हायरल
maaharashtra assembly election 2024 jayshree shelkes equal challenge to sanjay gaikwad in buldhana vidhan sabha constituency
बुलढाण्यात संजय गायकवाड यांच्यासमक्ष जयश्री शेळकेंचे तुल्यबळ आव्हान; कोण बाजी मारणार?
North Nagpur, Atul Khobragade, Employee Pension,
या अपक्ष उमेदवाराला निवडणुकीसाठी अनेक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी दिली एक महिन्याची पेन्शन
Marathwada assembly election 2024
मराठवाड्यात शिक्षकांकडून संस्थाचालकांचा प्रचार !
Assembly Elections 2024 Vanchit Bahujan Alliance Buddhist candidate print politics news
‘वंचित’चे निम्मे उमेदवार बौद्ध; प्रकाश आंबेडकर यांचे या वेळी ‘बौद्ध-मुस्लीम-ओबीसी’ समीकरण
What Devendra Fadnavis Said?
Devendra Fadnavis : “शरद पवारांनी दिलेला मंत्र आता…”, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य चर्चेत

हे ही वाचा >> नायडूंना खोटे बोलण्याची सवयच, जगन मोहन रेड्डी यांचे मोदींना पत्र; मुख्यमंत्र्यांवर थेट आरोप

१९९५ मध्ये राजकीय प्रवासाची सुरुवात

२४ नोव्हेंबर १९६८ रोजी गॅलवेला या छोट्याशा गावात दिसनायके यांचा जन्म झाला. ते चार वर्षांचे असताना केकीरावाला गेले. तिथेच त्यांचं बालपण गेलं. दंबूथगामा येथील गामिनी स्कूलमध्ये त्यांनी शालेय शिक्षण घेतलं. तर, केलानिया विद्यापीठांतर्गत येणाऱ्या दंबूथगामा सेंट्रल कॉलेजमधून त्यांनी पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं. त्यांनी मास्टर्स इन सायन्स अँड अ‍ॅग्रीकल्चरमधून पदवी मिळवली आहे. १९९५ मध्ये महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर दिसनायके यांनी राजकारणात पाऊल ठेवलं. १९९७ मध्ये त्यांची जेव्हीपीच्या यूथ विंगच्या राष्ट्रीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. १९९८ मध्ये त्यांना जेव्हीपीची केंद्रीय समिती आणि त्यानंतर राजकीय समितीत स्थान देण्यात आलं.

हे ही वाचा >> मोदी, बायडेन द्विपक्षीय चर्चा; हिंदप्रशांत सागरी प्रदेशासह जागतिक आणि प्रादेशिक मुद्दे उपस्थित

मुख्यमंत्रिपदाच्या निवडणुकीत पराभव

१९९८ मध्ये ते पहिली निवडणूक लढले. दिसनायके हे त्यावेळी त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा होते. मात्र त्या निवडणुकीत ते व त्यांचा पक्ष सपशेल अपयशी ठरला. मात्र दोन वर्षांनी खासदार म्हणून निवडून संसदेत गेले. २००४ मध्ये ते पुन्हा एकदा मोठ्या बहुमताने निवडणूक जिंकून खासदार म्हणून संसदेत गेले. त्यावेळच्या आघाडी सरकारमध्ये त्यांनी कृषी व इतर काही मंत्रिपदं सांभाळली. तर २००८ मध्ये त्यांची जेव्हीपीच्या संसदीय समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. परंतु, त्यानंतरच्या निवडणुकीत जेव्हीपीचा पराभव झाला. दिसनायके यांनी मात्र त्यांचा मतदारसंघ राखला.

हे ही वाचा >> चीनकडून ‘आपली’ परीक्षा! ‘क्वाड’ बैठकीत बायडेन यांची टिप्पणी; ‘हॉट माइक’मुळे जगजाहीर

२०१९ च्या निवडणुकीत ३ टक्के मतं, मग २०२४ च्या निवडणुकीत कसं केलं पुनरागमन?

जानेवारी २०१४ मध्ये यांनी दिसनायके यांनी सोमवंसा अमरसिंघे यांच्या जागी जेव्हीपीची सूत्रं आपल्या हाती घेतली. त्यांच्यामुळेच जेव्हीपीची व्होट बँक हळूहळू वाढत केली. २०१५ च्या सर्वसाधारण निवडणुकीत ते कोलंबोमधून खासदार म्हणून निवडून संसदेत गेले. त्यानंतरची त्यांची संसदेतील लक्षवेधी भाषणं पाहून त्यांना तरुणांकडून पसंती मिळू लागली. त्यांनी लोकांचा विश्वास मिळवला. २०१९ मध्ये दिसनायके हे श्रीलंकेच्या राजकारणातील मोठा चेहरा म्हणून उदयास आले. त्यानंतर त्यांना नॅशनल पीपल्स पॉवर या आघाडीचे अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलं. मात्र त्या निवडणुकीत त्यांना केवळ ३.१६ टक्के मतं मिळाली. पुढीच पाच वर्षे त्यांनी देशभर लोकसंपर्क वाढवला. परिणामी त्यांनी यंदा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली.