Delhi Liquor Scam : उत्पादन शुल्क धोरणातील कथित अनियमिततेमुळे आप विरुद्ध भाजपा असा सामना रंगला आहे. या गैरव्यवाहाराचा तपास करण्याच्या उद्देशाने सीबीआयने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानासहित ३१ ठिकाणी छापेमारी केली. या छापेमारीनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या लोकप्रियतेला भाजपा घाबरत आहे, असा दावा आप पक्षाकडून केला जात आहे. आप पक्षाच्या याच दाव्यानंतर भाजपाने पलटवार केला आहे. या घोटाळ्यात मनीष सिसोदिया यांचे नाव समोर येत असले तरी यामागे अरविंद केजरीवाल हे प्रमुख आहेत, असा दावा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केला आहे.

हेही वाचा >> “आगामी लोकसभा निवडणूक अरविंद केजरीवाल विरुद्ध नरेंद्र मोदी,” मनिष सिसोदिया यांचे मोठे विधान

“आज मनीष सिसोदिया यांनी पत्रकार परिषद घेतली. हा घोटाळा समोर आल्यानंतर सिसोदिया यांचा चेहरा पडला होता. पत्रकारांनी विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाचे ते उत्तर देऊ शकले नाहीत. अरविंद केजरीवाल यांनी समोर यावे आणि माझ्या प्रश्नांची उत्तरे २४ तासांच्या आत द्यावीत,” असे अनुराग ठाकुर म्हणाले.

हेही वाचा >> “केंद्राला भ्रष्टाचाराची नव्हे तर केजरीवाल यांची चिंता”, CBIच्या धाडीनंतर मनीष सिसोदियांची आगपाखड!

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल आणि नरेंद्र मोदी यांच्यात थेट लढत होणार आहे, असा दावा मनीष सिसोदिया यांनी केला. सिसोदिया यांच्या या वक्तव्यावरही आसामचे मुख्यमंत्री तथा भाजपा नेते हेमंत बिश्वा शर्मा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “अरविंद केजरीवाल आणि नरेंद्र मोदी यांच्यात थेट लढत होणार असेल तर चांगलेच आहे. त्यांचे नाव अजूनही अनेकांनी ऐकलेले नाही. याच कारणामुळे आम्ही मोठ्या मताधिक्याने विजयी होऊ,” असे हेमंत शर्मा म्हणाले.

हेही वाचा >> उत्तर प्रदेशात काका-पुतणा वाद! ‘कंस’, ‘श्रीकृष्ण’, ‘यदुवंशा’चे दाखले देत शिवपाल यादवांनी लिहिले खुले पत्र

दरम्यान, सिसोदिया यांनी सीबीआयने केलेल्या कारवाईत काहीही निष्पन्न होणार नाही. आम्ही आमचे काम आणखी जोमाने करू. नरेंद्र मोदी यांना भ्रष्टाचाराची चिंता नाही. त्यांना केजरीवाल यांच्या वाढत्या लोकप्रियतेची चिंता आहे. याच कारणामुळे आमच्यावर कारवाई केली जाते, असा दावा सिसोदिया यांनी केला आहे.

Story img Loader