दिल्लीनंतर पंजाबमध्ये सत्ता स्थापन करण्यात यश मिळवल्यानंतर आम आदमी पार्टीने आपला मोर्चा आता हिमाचल प्रदेशकडे वळवला आहे. आगामी काळात हिमाचल प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सर्व जागा लढवण्याचा आम आदमी पार्टीने निर्णय घेतला आहे. तर ‘आप’च्या या निर्णयावर भाजपा नेते आणि केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“उत्तर प्रदेशात ‘आप’ला एकही जागा मिळाली नाही. अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींच्या विरोधात निवडणूक लढवली पण त्यांना अनामत रक्कम गमवावी लागली. ते फक्त मोठ-मोठी विधानं करतात. त्यांच्याकडे इथे काहीही नाही. हिमाचल प्रदेशात आम्ही पुन्हा सत्तेत येऊ.” असं केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर यांनी हमीरपूरमध्ये म्हटलं आहे.

आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी पक्षाच्या निर्णयाबाबत शिमला येथे माहिती देताना सांगितलं होतं की, “ ‘आप’ला पंजाब विधानसभा निवडणुकीत सर्वसामान्यांचा पाठिंबा मिळाला आहे. यामुळे आम आदमी पार्टीचा उत्साह वाढला आहे. आता आप हिमाचलच्या सर्व ६८ विधानसभा जागांवर निवडणूक लढवणार आहे. हिमाचलमध्ये आम आदमी पार्टीची भाजपाशी स्पर्धा आहे. काँग्रेसचे कोणतेही आव्हान आम आदमी पार्टीसाठी नाही. भाजपाला हरवण्याचा मंत्र ‘आप’ला माहीत आहे.”

आम आदमी पार्टीने पंजाबनंतर आता हिमाचल प्रदेशकडे वळवला मोर्चा ; विधानसभा निवडणुकीत सर्व जागा लढवणार!

तसेच, “राज्यातील डॉक्टर आणि सुशिक्षित लोक आम आदमी पार्टीमध्ये सहभागी होत आहेत. ‘आप’ हिमाचलमध्येही शिक्षण आणि आरोग्य मोफत करेल. शिमला महापालिका निवडणूकही लढवणार असून यापूर्वी देखील महापालिका निवडणूक लढवली आहे.मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हिमाचलमध्ये येणार आहेत.” अशी माहिती देखील जैन यांनी दिली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anurag thakurs reaction on aaps decision to contest himachal pradesh assembly elections msr