रशियात झालेल्या वॅग्नर ग्रुपच्या बंडानंतर राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या नेतृत्त्वावरच प्रश्न उपस्थित केले जात होते. हे बंड शमल्यानंतरही त्याची चर्चा होते आहे. अशात आता या सगळ्या प्रकरणी पहिल्यांदाच पुतिन यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. वॅग्नर ग्रुपचे चीफ झिबिग्नी प्रिगोझीव्ह यांचं म्हणणं समोर आलं. त्यांनी विद्रोहाचं कारणही सांगितलं. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी देशाला संबोधन केलं आणि आपली प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हटलं आहे पुतिन यांनी?

जे बंड झालं त्यानंतर राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी एक संबोधन केले. त्यात ते म्हणाले की बंडाच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर रक्तपात होऊ नये याविषयीचे निर्देश दिले गेले होते. मात्र पाश्चिमात्य देशांना हे वाटतं आहे रशियन नागरिकांनी एकमेकांचा जीव घ्यावा. वॅग्नर ग्रुपमधले सदस्य हे लष्करात सहभागी होऊ शकतात किंवा बेलारुसला जाऊ शकतात. त्यांची इच्छा नसल्यास त्यांना घरीही परततात येईल. आम्ही जे बंड झालं ते २४ तासात संपवलं. यासाठी संपूर्ण देशाने जी एकजूट दाखवली त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो.

जे बंड झालं त्याला रशियाचे शत्रू जबाबदार आहेत असंही पुतिन यांनी म्हटलं आहे. तसंच मी हे सांगू शकतो की देशाला आणि जनतेला विद्रोहापासून वाचवण्यासाठी आम्ही आवश्यक ते सगळे उपाय केले आहेत.

दोन दिवसांपासून रशियामध्ये अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे तणाव निर्माण झाला होता. खुद्द राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनीच उभ्या केलेल्या वॅग्नर या समांतर सैन्यगटानं पुतिन यांच्याचविरोधात बंड केलं होतं. या गटाचा प्रमुख प्रिगोझिननं थेट देशाला नवा राष्ट्राध्यक्ष देण्याची घोषणाही करून टाकली होती. रशियन सैन्य आणि वॅग्नर ग्रुपचे सैनिक यांच्यातील वादाचं रुपांतर अवघ्या रशियावर अंतर्गत विध्वंसाची टांगती तलवार निर्माण होण्यामध्ये झालं होतं. मात्र, अखेर दोन्ही बाजूंनी झालेल्या वाटाघाटींनंतर वॅग्नर नरमले असून रशियातील संभाव्य विध्वंस टळला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Any attempt to cause internal turmoil in russia doomed to fail putin after wagner rebellion scj