केंद्र सरकारच्या काही अटी आणि शर्तींमुळे टेस्लाची इलेक्ट्रिक वाहने भारतीय बाजारात आतापर्यंत उतरू शकली नव्हती. परंतु, व्यापारवाढीसाठी टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी लवकरच भारतात येणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. यावरून पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केलं आहे. ते एएनआय या वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीत बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एलॉन मस्क हे नरेंद्र मोदी यांचे समर्थक आहेत, हा एक भाग झाला. पण ते भारताचेच समर्थक आहेत. मला भारतात गुंतवणूक पाहिजे आहे. पैसा किसी का भी लगा हो, पसिना मेरे देश का लगना चाहीए. (पैसा कोणाचाही लागला तरी घाम म्हणजेच मेहनत माझ्या देशाची असली पाहिजे) त्याला माझ्या देशातील मातीचा वास आला पाहिजे, जेणेकरून माझ्या देशातील तरुणांना रोजगार मिळेल, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

हेही वाचा >> टेस्लातील १० टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड, एलॉन मस्क यांनी मेलद्वारे दिला इशारा; म्हणाले, “खर्च कमी करण्यासाठी…”

एलॉन मस्क यांनी काही दिवसांपूर्वी ट्विट करत भारत दौऱ्याबाबत संकेत दिले होते. एलॉन मस्क आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीत टेस्लाच्या भारतातील गुंतवणुकीसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. एलॉन मस्क यांच्या टेस्लाला भारतात गुंतवणूक करण्यासाठी काही सवलती हव्या आहेत. 

टेस्लाचा प्रकल्प महाराष्ट्रात येणार की गुजरातमध्ये? 

टेस्लाचा प्रकल्प जर भारतात आला तर महाराष्ट्रात येणार की गुजरातमध्ये? हे लवकरच कळेल. मात्र, यावर आता केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सूचक विधान केले आहे. “टेस्ला सारख्या कंपन्या भारतात स्वारस्य दाखवत आहेत. कारण त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेवर येण्याबद्दल विश्वास आहे”, असे पियुष गोयल म्हणाले. टेस्लाचा प्रकल्प महाराष्ट्रात की गुजरातमध्ये उभारणार, याबाबत विचारले असता पियुष गोयल म्हणाले, “हम भारत के रहने वाले है भारत की बात करते है”, (आम्ही भारतात राहतो आणि आम्ही भारताबद्दल बोलतो), असे उत्तर पियुष गोयल यांनी दिले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anyones money sweat in my country what did pm modi say about elon musk coming to india sgk