देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही स्मार्ट शहरे बनवण्याची घोषणा केली असतानाच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी स्मार्ट खेडे व स्मार्ट प्रभाग कार्यक्रमाची सुरूवात केली त्यासाठी त्यांनी सात खेडय़ात १८ कि.मीची पदयात्राही सुरू केली आहे.
स्मार्ट खेडे व स्मार्ट प्रभाग कार्यक्रम ही नायडू यांची कल्पना असून त्यात खेडय़ाच्या विकासात लोकांचा र्सवकष सहभाग असावा अशी अपेक्षा आहे. खेडय़ातील लोकांनी एकत्र येऊन शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी, दूरसंचार व कौशल्य विकास यांचा समावेश असलेले विकास आराखडे तयार करण्यात सहभागी व्हावे अशी त्यांची अपेक्षा आहे. अनिवासी भारतीय, उद्योगसमूह व इतरांनी खेडय़ांच्या विकासात मदत करावी असेही त्यांनी म्हटले आहे.
पश्चिम गोदावरी जिल्ह्य़ातील वेलिवेणू येथे नायडू यांनी स्मार्ट खेडे-स्मार्ट प्रभाग या कार्यक्रमाची सुरूवात केली. जे लोक खेडय़ाचून देशाच्या इतर भागात गेले आहेत त्यांनी आपल्या मूळ गावांच्या विकासात मदत करावी. अनेक लोकांनी त्याला प्रतिसादही दिला.
तेलगु देसमचे संस्थापक व माजी मुख्यमंत्री एन.टी.रामाराव यांच्या १९ व्या स्मृती दिनी त्यांनी ही योजना सुरू करून खेडय़ातील लोकांशी संवाद साधला. यावेळेस त्यांनी लोकांनी लोकांच्या निधीतून बांधलेल्या समाजमंदिराचे उदघाटन केले.याच खेडय़ापासून त्यांनी पदयात्रा सुरू केली असून ते सेट्टीपेटा, तलापालेम, सिंगावरम निदादावोलू, चांगलू  व ब्राह्मणागुडेम येथे जाणार आहेत.

Story img Loader