Rahul Gandhi: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी ( Rahul Gandhi ) हे सध्या प्रचंड आक्रमक झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला ९९ जागा मिळाल्या तर इंडिया आघाडीने २२५+ जागांवर मजल मारली. ज्यानंतर राहुल गांधी यांचं एक वेगळंच रुप देशाला पाहण्यास मिळतं आहे. पहिल्याच भाषणात त्यांनी भगवान शंकराचा फोटो दाखवला आणि आमच्याबरोबर भगवान शंकर कसे आहेत हे सांगत नरेंद्र मोदी आणि अमित शाह तसंच भाजपावर जोरदार टीका केली. त्यानंतर नुकतंच त्यांनी लोकसभेत भाषण केलं ज्यात त्यांनी महाभारतातल्या अभिमन्यूचा संदर्भ दिला आणि चक्रव्यूह कसा रचला जातो आहे ते सांगितलं. या सगळ्यानंतर राहुल गांधींनी ( Rahul Gandhi ) केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राहुल गांधी काय म्हणाले होते?

अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान केलेल्या भाषणात राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी शेतकरी, युवा, महिला, कामगार, लघु-उद्याोजक, दलित-आदिवासी, ओबीसींची तुलना अभिमन्यूशी केली. सहा जणांनी अभिमन्यूची हत्या केली. आताच्या आधुनिक चक्रव्यूहात आधुनिक अभिमन्यूंना अडकवले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, सरसंघचालक मोहन भागवत, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, उद्याोगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदाणी या सहा जणांनी हा आधुनिक चक्रव्यूह रचल्याचा आरोप गांधी यांनी केला. या लोकसभेतच ‘इंडिया’ आघाडी हमीभावाचा कायदा आणि जातगणना संमत करेल, असा विश्वास व्यक्त करतानाच मध्यमवर्गही भाजपपासून दूर जात असल्याचा दावा गांधी ( Rahul Gandhi ) यांनी केला.

सरकारचा ‘चक्रव्यूह’ भेदणार! राहुल गांधींचा लोकसभेत घणाघात; हमीभाव, जातगणनेचे आश्वासन

हे पण वाचा- Rahul Gandhi in Wayanad : “वडिलांना गमावल्यानंतर जे दुःख झालं, तेच दुःख आज होतंय”, वायनाडची परिस्थिती पाहून राहुल गांधी व्यथित

आता राहुल गांधी यांनी काय पोस्ट केली आहे?

“दोघांपैकी एकाला माझं चक्रव्यूह संदर्भ देऊन केलेलं भाषण आवडलं नाही. ईडीतल्या आतल्या गटाने मला सांगितलं की तुमच्यावर आता छापेमारी केली जाणार आहे. त्यासंदर्भात योजना तयार केली जात आहे. मी तयार आहे, ईडीची वाट पाहतो आहे. चहा आणि बिस्किटं माझ्याकडून.” अशी सूचक पोस्ट राहुल गांधींनी केली आहे.

सध्याचा चक्रव्यूह कमळाच्या आकाराचं आहे-राहुल गांधी

२९ जुलै रोजी लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्पावर बोलत असताना राहुल गांधींनी ( Rahul Gandhi ) चक्रव्युहाचा संदर्भ दिला होता. एवढंच नाही तर सध्याचं चक्रव्यूह हे कमळाच्या आकाराचं आहे, ते चक्रव्यूहही त्याच आकाराचं होतं. आजच्या चक्रव्यूहात सहा लोक आहेत. त्यावेळी सहा लोक होते. तसेच आजही आहे. त्यात मोदी, शाह, संघ प्रमुख मोहन भागवत, डोवाल, अदानी आणि अंबानी आहेत. हे सर्व काही कंट्रोल करत आहेत. असं राहुल गांधी म्हणाले होते. आता राहुल गांधींनी त्यांच्यावर ईडीची छापेमारी होणार आहे अशी पोस्ट केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Apparently 2 in 1 did not like my chakravyuh speech ed insiders tell me a raid is being planned said rahul gandhi scj