युरोपीय समुदायात यावर्षी आतापर्यंत आठ लाख निर्वासित आल्याची माहिती चुकीची असून काही निर्वासितांची नोंद दोनदा झाल्याने आकडा जास्त दिसत आहे. ही संख्या सात लाख दहा हजापर्यंत आहे. सीमा सुरक्षा संस्था असलेल्या फ्रंटेक्स या संस्थेने ‘बाइल्ड’ या जर्मन वृत्तपत्राला ही माहिती दिली. असे असले तरी स्थलांतरितांची संख्या अजूनही परमोच्च पातळीला पोहोचलेली नाही त्यामुळे आतातरी बेकायदेशीर स्थलांतरितांना पकडून माघारी पाठवावे, असे आवाहन संस्थेचे फॅब्रिस लेगेरी यांनी केले आहे.
अडचणी अजून पुढे आहेत असे सांगून ते म्हणाले की, युरोपीय समुदायांनी धोका ओळखून वेळीच बेकायदा स्थलांतरितांना परत पाठवावे. गेल्या नऊ महिन्यात सात लाख दहा हजार निर्वासित आले असले तरी ही गणतीही बरोबर नाही. काही लोकांनी दोनदा सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केल्याने त्यांची गणना दोनदा झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा