अॅपलचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित आयफोन ७ आणि आयफोन ७ प्लस तसेच अॅपल वॉच २ चे बुधवारी अमेरिकेतल्या सॅन फ्रान्सिस्कोमध्ये भव्य सोहळ्यात अनावरण करण्यात आले. आयफोन ७ हे ६४९ डॉलर्स (भारतीय चलनानुसार ४३,१०० रुपये) तर आयफोन ७ प्लस हे ७४७ डॉलर्स (भारतीय चलनानुसार ४९, ७०० रुपये) असणार आहे. तर अॅपल वॉच २ ची किंमत ३६९ डॉलर्स (भारतीय चलनानुसार २४,५०० रुपये) असणार आहे.
सॅनफ्रान्सिस्कोमध्ये खचाखच भरलेल्या सभागृहात अॅपलच्या उत्पादनांचं अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात एका व्हिडीओने झाली. या व्हिडीओत कूक कार्यक्रमासाठी गाडीने रवाना झाल्याचे दाखवण्यात आले. हा व्हिडीओ संपल्याच्या काही क्षणातच टीम कूक मंचावर उपस्थित होते. सर्वप्रथम कुक यांनी अॅपल म्यूझिक आणि अॅपल स्टोअरविषयी माहिती दिली. यात त्यांनी मारिओ या सुप्रसिद्ध गेम अॅप स्टोअरवरही उपलब्ध असेल असे जाहीर केले. या गेमचे नाव सुपर मारिओ रन असे असणार आहे. यानंतर त्यांनी बहुप्रतिक्षित अॅपल वॉच २ लाँच केले. OS 2 वर चालणारे अॅपल वॉचमध्ये बिल्ट इन जीपीएस असणार आहे. अॅपल वॉच २ हे जलरोधकही असणार आहे. पोकेमॉन गो हा गेमदेखील या वॉचवर खेळणे शक्य होईल. याशिवाय क्रीडाप्रेमींसाठी अॅपल वॉच नाइकी प्लस हे उत्पादनही बाजारात आणले आहे. अॅपल वॉच २ आणि अॅपल वॉच नाइकी प्लस या दोघांची किंमत ३६९ डॉलर्स असणार आहे.
अॅपल वॉच लाँच केल्यानंतर कूक यांनी अॅपल ऑपरेटिंग सिस्टम iOS विषयी माहिती दिली. अत्याधुनिक ऑपरेटिंग सिस्टमसाठी तुमचे डिव्हाईसदेखील अत्याधुनिक असणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले. कूक यांनी अप्रत्यक्षपणे आयफोन ७ कडे इशारा केला आणि मग सर्वांनाच उत्सुकता असलेले आयफोन ७ आणि आयफोन ७ प्लस हे फोन्स लाँच केले. हे दोन्ही फोन १० बाबतीत अन्य आयफोनपेक्षा सर्वोत्तम असल्याचे त्यांनी सांगितले. यात डिझाईन, कॅमेरा, परफॉमन्स आदी मुद्द्यांचा समावेश आहे. १६ सप्टेंबरपासून ही सर्व उत्पादन अमेरिकेतच्या बाजारपेठेत उपलब्ध होतील. भारतातील अॅपलप्रेमींना या उत्पादनांसाठी आणखी काही दिवस वाट बघावी लागणार आहे.
सॅन फ्रान्सिस्कोमध्ये अॅपल आयफोनचा अनावरण सोहळा सुरु असलेल्या सभागृहात अलोट गर्दी..
Live Updates
आयफोन ७ प्लस हा फोनदेखील ३२ जीबी, १२८ जीबी आणि २५६ जीबीमध्ये मिळणार. यात आयफोन ७ प्लस ३२ जीबी या फोनची किंमत ७६९ डॉलर्स ऐवढी असेल.
आयफोन ७ हा फोन ३२ जीबी, १२८ जीबी आणि २५६ मध्ये मिळणार. ३२ जीबी फोनची किंमत ६४९ डॉलर्सऐवढी असेल. भारतात हा फोन लाँच होण्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार
आयफोनमध्ये ७ मध्ये ए १० फ्यूजन चिप ही ६४ बीट क्वाड कोअर प्रोसेसरची असेल. यात दोन उच्च क्षमतेचे कोअर्स असतील. यात बॅटरी जास्त वापरली जाणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे.
आयफोन ७ आणि आयफोन ७ प्लसमध्ये स्टिरीओ स्पीकर्स असतील. या फोनमधून इअरफोन बाद झालेत. वायरलेस तंत्रज्ञानाचा वापर. इअरपॉड्सचा वापर करुन गाणी ऐकता येणार.
आयफोन ७ प्लसमध्ये ड्युएल लेन्स कॅमेरा असणार.
आयफोन ७ प्लसमध्ये १२ मेगापिक्सेलचे दोन कॅमेरा असणार, यातला एक कॅमेरा वाईड अँगलचा असेल तर दुसरा ५६ मीमीचे टेलिफोटो काढण्यासाठी असेल.
आयफोन ७ चा कॅमेरा हे आणखी एक वैशिष्ट्य असेल, आयफोन ७ मध्ये फक्त एकच कॅमेरा असेल, यात १२ मेगापिक्सेलचे सेन्सर आणि चार एलईडी फ्लॅश असतील, फ्रंट कॅमेरा ७ मेगापिक्सेलचा असेल.
आयफोन ७ वॉटरप्रूफ आणि डस्ट प्रूफ असेल, होम बटण हे जास्त रिस्पॉन्सिव्ह असेल.
आयफोन ७ काळ्या, ग्लॉस ब्लॅक, सोनेरी, चंदेरी आणि रोज गोल्ड या रंगांमध्ये मिळणार.
टीम कूक यांनी केले आयफोन ७ चे अनावरण.
क्रीडा विभागासाठी अॅपल वॉच नाइकी प्लस हे विशेष घड्याळही अॅपलने बाजारात आणले आहे.
दुप्पट ब्राईटनेस दिल्याने युजर्ससाठी अॅपल वॉच २ फायदेशीर ठरणार, अॅपल वॉच २ ची किंमत ३६९ डॉलर्स ऐवढी असेल
वेगवान प्रोसेसर, जलरोधक यंत्रणा, जीपीएस प्रणाली हे अॅपल वॉच २ ची प्रमुख वैशिष्ट्ये
श्वासावर नियंत्रण ठेवणा-या आरोग्य विषयक अॅप्सपासून ते गेमिंग अॅप्सचा अॅपल वॉच २ मध्ये समावेश.
अॅपल वॉच २ जलरोधक असेल आणि उत्तम दर्जाच्या ड्यूऍल कोअर प्रोसेसरमुळे अॅपल वॉचचा वेग वाढणार.
अॅपल वॉच २ चे लाँचिंग, अॅपल वॉच २ मध्ये गेम खेळण्याची सुविधा, पॉकिमोन गो खेळता येणार.
अॅपल स्टोअरवरुन १४० बिलीयनहून अधिक अॅप्लिकेशन डाऊनलोड होत आहेत. गेल्या दोन महिन्यात यामध्ये १०६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यातून प्ले स्टोअरच्या उत्पन्नात दुप्पटीने वाढ झाली.
अॅपल म्यूझिकचे १७ मिलीयनहून अधिक सबस्क्रायबर आहेत. भारतातून होणा-या सबस्क्रीप्शनचे प्रमाणही वाढले आहे, टीम कूक यांची अनावरण सोहळ्यात माहिती
आयफोन ७ च्या अनावरण सोहळ्याला सुरुवात, टीम कूक यांचे मंचावर आगमन
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in