तंत्रप्रेमींच्या गळ्यातील ताईत असलेल्या अॅपलकडून काल आयफोन श्रेणीतील दोन नव्या मॉडेलची आणि त्याच्या वैशिष्ट्यांची माहिती देण्यात आली. आयफोन ६ एस आणि आयफोन ६ एस प्लस या दोन मॉडेलची बुधवारी सॅनफ्रान्सिस्कोमध्ये घोषणा करण्यात आली. हा फोन अमेरिकेमध्ये याच महिन्यात उपलब्ध होणार असून, भारतामध्ये तो मिळण्यासाठी आणखी काही महिने वाट पाहावी लागणार आहे.
या फोनची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे…
– यामध्ये थ्री डी टच डिस्प्ले तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. यापूर्वी अॅपल वॉचमध्ये हे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.
– १२ मेगापिक्सलचा पाठीमागील कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा पुढील कॅमेरा. त्यासोबत रेटिना फ्लॅशही देण्यात आला असून, त्यामुळे कॅमेऱयातील दृश्य तीन पटीने अधिक स्पष्ट दिसेल
– ‘रोझ गोल्ड’ या नव्या रंगात हो फोन उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर आधीच्या सिल्व्हर, गोल्ड, स्पेस ग्रे रंगातही तो उपलब्ध असेलच
– ६ एस आणि ६ एस प्लसचा स्क्रीन साईज ४.७ इंच आणि ५.५ इंच असेल. यामध्ये रेटिना एचडी डिस्प्लेही देण्यात आला आहे
– १६ जीबी, ६४ जीबी, १२८ जीबी मध्ये हे दोन्ही मॉडेल उपलब्ध असतील
– दोन्ही मॉडेलमध्ये ३८४० X २१६० रिझोल्यूशन उपलब्ध असल्यामुळे व्हिडीओ रेकॉर्डिंग सहजशक्य होईल
इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, हाँगकाँग, जपान, न्यूझिलंड, सिंगापूर याही देशांमध्ये याच महिन्यात २५ तारखेपासून हे दोन्ही मॉडेल विक्रीसाठी उपलब्ध असतील. १२ सप्टेंबरपासून त्यासाठी आगाऊ नोंदणीही करता येईल.

Story img Loader