किंमत ३०,९९० पासून १४ लाखांपर्यंत
अमेरिकेतील आघाडीची तंत्रज्ञान कंपनी असलेल्या अ‍ॅपलने स्मार्ट घडय़ाळांची विक्री भारतात सुरू केली असून, त्यातील सर्वात चांगले मॉडेल १४ लाख रुपयांना आहे.
अ‍ॅपलच्या किरकोळ विक्री बाजार व्यवस्थेच्या सूत्रांनी सांगितले, की सर्वात जास्त सुविधा असलेल्या घडय़ाळाची किंमत १४ लाख रुपये आहे. या घडय़ाळाच्या किमती ३०,९९० ते १४ लाख दरम्यान आहे. देशातील १०० अ‍ॅपल प्रीमियम स्टोअर्समधून ही घडय़ाळे विक्रीस आहेत. वेगवेगळय़ा डिस्प्ले आकारात म्हणजे ३८ मि.मी. व ४२ मि.मी.मध्ये ती उपलब्ध आहेत. अ‍ॅपल घडय़ाळे १८ कॅरट रोज गोल्ड, व्हाइट स्पोर्ट्स बँड, ४२ मि.मी. डिस्प्ले या स्वरूपात उपलब्ध आहेत. त्यांची किंमत ९.९ लाख रुपये आहे. ४२ मि.मी. डिस्प्लेचे दोन प्रकार अ‍ॅल्युमिनियम केस व स्पोर्ट्स बँड असे असून त्यांच्या किमती ३४९०० रुपये आहेत. स्टेनलेस स्टील केस व व्हाइट स्पोर्ट्स बँड रूपातील घडय़ाळांची किंमत ५२९०० रुपये आहे. ३८ मि.मी. वर्गात अ‍ॅपल घडय़ाळे स्पोर्ट व अ‍ॅल्युमिनियम केस स्वरूपात असून त्यांची किंमत ३०९०० रुपये आहे. स्टेनलेस स्टील केस व व्हाइट स्पोर्ट्स बँड स्वरूपात त्यांची किंमत ४८९०० रुपये आहे. १८ कॅरट गोल्ड केस, व्हाइट स्पोर्ट्स बँड स्वरूपातील घडय़ाळाची किंमत ८.२ लाख रुपये आहे.
टिम कुक यांनी सूत्रे घेतल्यानंतरचे हे सर्वात नवीन उत्पादन आहे. २०१० नंतर अ‍ॅपलच्या उत्पादनातील हा नवा प्रकार आहे. आधी आयपॅडची निर्मिती अ‍ॅपलने केली होती.

अ‍ॅपल घडय़ाळाचे उपयोग
*कॉल घेणे
* छायाचित्रे काढणे
*संगीत श्रवण
*इन्स्टाग्राम छायाचित्रांचे व्यवस्थापन
* शरीराच्या तंदुरुस्तीवर लक्ष ठेवणे
* ईमेल वाचणे

Story img Loader