किंमत ३०,९९० पासून १४ लाखांपर्यंत
अमेरिकेतील आघाडीची तंत्रज्ञान कंपनी असलेल्या अॅपलने स्मार्ट घडय़ाळांची विक्री भारतात सुरू केली असून, त्यातील सर्वात चांगले मॉडेल १४ लाख रुपयांना आहे.
अॅपलच्या किरकोळ विक्री बाजार व्यवस्थेच्या सूत्रांनी सांगितले, की सर्वात जास्त सुविधा असलेल्या घडय़ाळाची किंमत १४ लाख रुपये आहे. या घडय़ाळाच्या किमती ३०,९९० ते १४ लाख दरम्यान आहे. देशातील १०० अॅपल प्रीमियम स्टोअर्समधून ही घडय़ाळे विक्रीस आहेत. वेगवेगळय़ा डिस्प्ले आकारात म्हणजे ३८ मि.मी. व ४२ मि.मी.मध्ये ती उपलब्ध आहेत. अॅपल घडय़ाळे १८ कॅरट रोज गोल्ड, व्हाइट स्पोर्ट्स बँड, ४२ मि.मी. डिस्प्ले या स्वरूपात उपलब्ध आहेत. त्यांची किंमत ९.९ लाख रुपये आहे. ४२ मि.मी. डिस्प्लेचे दोन प्रकार अॅल्युमिनियम केस व स्पोर्ट्स बँड असे असून त्यांच्या किमती ३४९०० रुपये आहेत. स्टेनलेस स्टील केस व व्हाइट स्पोर्ट्स बँड रूपातील घडय़ाळांची किंमत ५२९०० रुपये आहे. ३८ मि.मी. वर्गात अॅपल घडय़ाळे स्पोर्ट व अॅल्युमिनियम केस स्वरूपात असून त्यांची किंमत ३०९०० रुपये आहे. स्टेनलेस स्टील केस व व्हाइट स्पोर्ट्स बँड स्वरूपात त्यांची किंमत ४८९०० रुपये आहे. १८ कॅरट गोल्ड केस, व्हाइट स्पोर्ट्स बँड स्वरूपातील घडय़ाळाची किंमत ८.२ लाख रुपये आहे.
टिम कुक यांनी सूत्रे घेतल्यानंतरचे हे सर्वात नवीन उत्पादन आहे. २०१० नंतर अॅपलच्या उत्पादनातील हा नवा प्रकार आहे. आधी आयपॅडची निर्मिती अॅपलने केली होती.
अॅपल स्मार्ट घडय़ाळांची विक्री भारतात सुरू
देशातील १०० अॅपल प्रीमियम स्टोअर्समधून ही घडय़ाळे विक्रीस आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 07-11-2015 at 02:55 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Apple watch launched in india