कोणतीही गाडी तुम्हाला चालवायची असल्यास, तुमच्याकडे गाडी चालविण्याचा परवाना असणे गरजेचे आहे. विना परवाना गाडी चालवणे हा कायद्याने गुन्हा मनाला जातो. परवाना काढण्यासाठी आपल्याला आरटीओमध्ये जावे लागतेय. पण उत्तर प्रदेशमध्ये ट्रान्सपोर्टच्या नियमात बदल करण्यात आला आहे. आता उत्तर प्रदेशमध्ये गाडीचा परवाना डाक कार्यलयात काढून मिळणार आहे. उत्तर प्रदेशचे प्रदेशिक परिवाहन विभाग आणि डाक विभागामध्ये चर्चा सुरू आहे. उत्तर प्रदेशच्या परिवाहन विभागाने राज्य सरकारला प्रस्तावही पाठवला आहे. नागरिकांना किचकट प्रक्रियेपासून दिलासा मिळावा परिवाहन विभागाने हे पाऊल उचलले आहे. या प्रस्तावासह परिवाहन विभागाने डाक विभागाला ऑनलाइन परवानासाठी एक वेगळी खिडकी(काऊंटर) सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
परवाना बनण्यासाठी डाक विभागामध्ये देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये अर्जासाठी योग्य ती रक्कम आकारण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून या प्रस्तावाला मंजूरी मिळाल्यानंतर परिवाहन विभाग डाक विभागाबरोबर औपचारिक करार करेल. डाक कार्यलयामध्ये नवीन सुरू होणाऱ्या परवाना विभागात तुम्ही तुमचा पत्ता बदलू शकता किंवा कोणतीही माहिती अपडेट करू शकता. या सर्व सुविधेसाठी किती शुल्क आकारले जाईल याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही.
गेल्या काही दिवासांपासून उत्तर प्रदेशमध्ये परवाना काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज मोठ्या प्रमाणावर येत आहेत. जवळजवळ ९० टक्के अर्ज ऑनलाईन पद्धतीने आले आहेत. भारतातील २७ राज्यांमध्ये गाढी चालवण्याचा परवाना काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज केले जातात. यामध्ये तामिळनाडू, गुजराज, महाराष्ट्र आणि हरियाणासारख्या राज्यांचा समावेश आहे.