येमेनमध्ये असलेला अल कायदा या अतिरेकी संघटनेचा म्होरक्या ड्रोन हल्ल्यांत ठार झाला असल्याचा दावा येमेनच्या अधिकृत वृत्तसंस्थेने केला आहे. सईद अल शिहरी असे या अतिरेक्याचे नाव असून तो येमेनमधील अल कायदाचा उपप्रमुख होता.
सईद हा सौदी अरेबियाचा नागरिक होता. अफगाणिस्तानातील युद्धात त्याने सहभाग घेतला होता. तसेच ग्वांटानामो बे येथील अमेरिकेच्या युद्धकैद्यांच्या तुरुंगात त्याने ६ वर्षे काढली होती. सादा शहराच्या दक्षिणेकडील भागात केलेल्या ड्रोन हल्ल्यामध्ये २८ नोव्हेंबर रोजी तो जखमी झाला होता. तेव्हापासून तो कोमातच होता. अखेर गुरुवारी त्याचा मृत्यू झाल्याचा दावा येमेन वृत्तसंस्थेने केला.
अल कायदाचा म्होरक्या येमेनमध्ये ठार
येमेनमध्ये असलेला अल कायदा या अतिरेकी संघटनेचा म्होरक्या ड्रोन हल्ल्यांत ठार झाला असल्याचा दावा येमेनच्या अधिकृत वृत्तसंस्थेने केला आहे. सईद अल शिहरी असे या अतिरेक्याचे नाव असून तो येमेनमधील अल कायदाचा उपप्रमुख होता.
First published on: 25-01-2013 at 05:54 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aqap deputy emir said al shihri is dead yemeni government