भारतीय संगीत क्षेत्रातील आघाडीचं नाव असणाऱ्या ए. आर. रेहमान यांची आई करीना बेगम यांचे निधन झाले. सोमवारी चेन्नईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रेहमान यांनी ट्विटरवर आईचा फोटो पोस्ट करत निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिग्दर्शक मोहन राजा, निर्माते डॉ. धनंजयन, गायिका हर्षदीप कौर, श्रेया घोषाल, दिग्दर्शक शेखर कपूर यांसारख्या कलाक्षेत्रातील अनेकांनी सोशल मीडियाद्वारे शोक व्यक्त केला.

वडील व संगीतकार आर. के. शेखर यांच्या निधनानंतर आई करीमा यांनीच रेहमान यांचं संगोपन केलं. वडिलांच्या निधनाच्या वेळी रेहमान फक्त नऊ वर्षांचे होते. आपल्यातील संगीताची आवड व जाण ही सर्वांत आईनेच ओळखली, असं रेहमान यांनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं होतं. वडिलांच्या निधनानंतर रेहमान यांच्या कुटुंबाची परिस्थितीच बदलली. त्यावेळी आपल्या वडिलांची वाद्ये भाड्याने देऊन त्यांनी कुटुंबाचा गाडा चालवला. काही दिवसांनी त्यांच्या आईने हा व्यवसाय सांभाळला आणि रेहमान यांना कामाचे स्वातंत्र्य दिले. सुरुवातीच्या नकारानंतर आईच्या आग्रहास्तव रेहमान यांनी ‘रोजा’ या चित्रपटाला संगीत दिलं होतं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ar rahman mother kareema begum passes away ssv