एपी, अम्मान, जॉर्डन
इस्रायल- हमास युद्धात हजारो पॅलेस्टिनी नागरिकांच्या मृत्यूबद्दल इस्रायलला दोष देणाऱ्या अरब नेत्यांनी शनिवारी तत्काळ युद्धविरामाची मागणी केली. मात्र, अशी कृती अंगावर उलटणारी ठरू शकते आणि त्यामुळे हमास या दहशतवादी गटाला अधिक हिंसाचारासाठी प्रोत्साहन मिळू शकते, असा इशारा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी दिला.
ब्लिंकन यांनी शनिवारी दुपारी इजिप्त, जॉर्डन, सौदी, कतार व संयुक्त अरब अमिरातीचे राजदूत आणि एक वरिष्ठ पॅलेस्टिनी अधिकारी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर, गाझामधील नागरिकांचे संरक्षण करणे आणि वेढल्या गेलेल्या गाझामध्ये जादा प्रमाणात मदत पाठवणे या विषयांवर जॉर्डन व इजिप्त देशांच्या आपल्या समपदस्थांसोबत चर्चा करण्यासाठी ते त्यांच्यासोबत उभे राहिले.अरब देशांचे मंत्री आणि इस्रायलचा सर्वात जवळचा मित्र असलेल्या अमेरिकेचे उच्चपदस्थ राजनैतिक अधिकारी यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. अरब मंत्र्यांनी हे युद्ध थांबवण्याचे वारंवार आवाहन केले आणि इस्रायलच्या युद्ध रणनीतीचा निषेध केला.
हेही वाचा >>>सरकारी कर्मचारी असलेल्या महिलेचा चाकू भोसकून खून, घटनेनं एकच खळबळ
जॉन्सन, मॉरिसन इस्रायलमध्ये हमाससोबत
सध्या सुरू असलेल्या युद्धात इस्रायलला पाठिंबा दर्शवण्यासाठी ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन व ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान स्कॉट मॉरिसन हे तेल अवीवमध्ये आल्याचे वृत्त ‘दि टाइम्स ऑफ इस्रायल’ने दिले आहे. या भेटीत जॉन्सन व मॉरिसन हे इस्रायलचे अध्यक्ष इसाक हेझरेग यांना, तसेच दहशतवाद्यांनी गाझामध्ये ओलीस ठेवलेल्या लोकांच्या कुटुंबीयांना भेटणार आहेत.
‘गाझावर अणुबॉम्ब टाकण्याचाही पर्याय’
‘गाझावर अणुबॉम्ब टाकणे हा ‘एक पर्याय आहे’, असे वक्तव्य इस्रायलमधील अति-उजव्या ओझमा येहुदित पक्षाच्या एका मंत्र्याने केल्यानंतर पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी सरकारच्या बैठकांमधून त्यांना अनिश्चित काळासाठी निलंबित केले.‘गाझामध्ये न लढणारे कुणीही नाही आणि त्या भागात मानवीय आधारावर मदत पुरवणे हे अपयश ठरेल’, असे जेरुसलेम व्यवहार व वारसा मंत्री अमिहाई एलियाहू यांनी म्हटले होते. तुमच्या मते गाझामध्ये न लढणारे कुणीही नसल्यामुळे गाझा पट्टीवर अणुहल्ला हा पर्याय आहे काय असे विचारले असता, ‘तो एक मार्ग आहे’, असे ते म्हणाले.