राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुलै २०२३ या महिन्यात उभी फूट पडली. अजित पवार हे राष्ट्रवादी पक्षाच्या आमदारांना घेऊन सत्तेत सहभागी झाले. त्यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे ४२ आमदार आहेत. त्यामुळे हा पक्ष फुटला आहे. अजित पवारांना पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह घड्याळही मिळालं आहे. तसंच बारामतीची लोकसभा निवडणूकही नुकतीच पार पडली आहे. या सगळ्यानंतर शरद पवारांच्या लेडी जेम्स बाँड अशी ओळख असलेल्या सोनिया दुहान या अजित पवारांच्या पक्षात जाणार अशा चर्चा सुरु झाल्या. त्याबाबत त्यांना विचारलं असता त्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोनिया दुहान या शरद पवारांच्या राजीनाम्याच्या वेळीही त्यांच्या बरोबर होत्या

राष्ट्रवादीत बंड होण्यापूर्वी शरद पवारांनी त्यांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता आणि त्यानंतर जेव्हा तो मागे घेतला तेव्हा त्या शरद पवारांच्या मागच्या खुर्चीत बसल्या होत्या. त्यांच्या तिथे असण्याने सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं तसंच पहाटेचा शपथविधी झाला तेव्हाही त्यांचं नाव चर्चेत होतं. शरद पवारांच्या अत्यंत विश्वासू सहकारी आणि ‘लेडी जेम्स बाँड’ समजल्या जाणाऱ्या सोनिया दुहान आता शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार या चर्चा सोमवारी सुरु झाल्या. याचं कारण सोनिया दुहान या अजित पवारांनी बोलवलेल्या बैठकीला मागच्या दाराने पोहचल्या. धीरज शर्मा आणि सोनिया दुहान असे दोघेही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत, हे जवळपास निश्चित असल्याच्या चर्चा सोमवारी झाल्या. याच बाबत आता सोनिया दुहान यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

शरद पवार – राहुल गांधी यांच्यातल्या बैठकीत काय चर्चा झाली? सोनिया दुहान म्हणाल्या…

काय म्हणाल्या सोनिया दुहान?

मी शरद पवार गट सोडलेला नाही, तसंच मी दुसऱ्या पक्षात म्हणजेच अजित पवारांच्या गटात जाणार नाही. मला काल लोकांनी पाहिलं आणि त्यानंतर चर्चा सुरु झाली. मात्र अजित पवारांच्या घरी आमदार आले तेव्हा तर सुप्रिया सुळेही तिथे होत्या. पक्ष फुटण्याच्या काही तास आधी सुप्रिया सुळेही अजित पवारांच्या निवासस्थानी होत्या. त्यांनी कुठे अजित पवारांचा पक्ष सोडला. मी कुठलाही पक्ष सोडलेला नाही. तसंच मी शरद पवारांचा पक्ष सोडणार नाही.

कोण आहेत सोनिया दुहान?

सोनिया दुहान या युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. तसंच त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्याही आहेत. शरद पवारांनी राजीनामा मागे घेण्यासंदर्भात मे २०२३ मध्ये जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेत सोनिया दुहान या शरद पवारांच्या मागेच बसल्या होत्या. सोनिया दुहान या हरियाणामधल्या हिसारच्या रहिवासी आहेत. त्यांच्या तीन भावंडांमध्ये त्या सगळ्यात मोठ्या आहेत. हिसारमध्ये सोनिया दुहान यांनी शालेय शिक्षण घेतलं आहे. यानंतर कुरुक्षेत्र विद्यापीठातून Bsc. केलं आहे. त्यानंतर त्या अंबाला या ठिकाणी आल्या. वैमानिक म्हणून प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांचं वास्तव्य पुण्यात होतं. त्यावेळी त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आल्या. वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दिल्ली विद्यापीठात दोन निवडणुकांमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व केलं होतं. सोनिया दुहान राष्ट्रवादीच्या महासचिवही होत्या.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Are you join ajit pawar praty sonia duhan gave this answer scj
Show comments