अमेरिकेतील अर्कान्सास येथील खासदाराने विधेयकावर सुरु असलेल्या जनसुनावणी दरम्यान एका ट्रान्सजेंडर महिलेला सर्वांसमोर अतिशय घाणेरडा प्रश्न विचारला. या प्रश्नावर अर्कान्सास राज्यातच नाही तर संपूर्ण अमेरिकेतून टीका होत आहे. डॉ. ग्वेंडोलिन हर्झिग या ३३ वर्षीय ट्रान्सजेंडर महिलेने राज्याच्या न्यायिक समितीसमोर आपली साक्ष नोंदविली. त्यावेळी रिपब्लिकन पक्षाचे खासदार मॅट मॅकी यांनी हर्झिगला तिच्या गुप्तांगाबद्दल विचारणा केली. मॅट मॅकी यांच्या या प्रश्नानंतर सुनावणीसाठी उपस्थित असलेल्या लोकांनीही आश्चर्य व्यक्त केले. काहींनी तर मोठ्याने ओरडून हे अतिशय लज्जास्पद असल्याचे म्हटले. हर्झिगला मात्र क्षणभर काहीच सुचले नाही. स्वतःला सावरल्यानंतर ती म्हणाली की, मी माझ्या अधिकारांबाबत जागृत असून तुमचा प्रश्न अत्यंत चुकीचा आहे.
हे वाचा >> टॉपलेस होत रशियन महिलेचा विमानात धिंगाणा; कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न, सिगारेट ओढण्याची मागणी आणि…
या सुनावणीतील खासदार काय म्हणाले, ऐका
एक लोकप्रतिनिधी असा प्रश्न कसा काय विचारू शकतो? आधी पुरुष असलेला हर्झिग ऑपरेशन केल्यानंतर ट्रान्सजेंडर महिला बनला आहे. हर्झिग उच्चशिक्षित असून त्याच्याकडे फार्मसीची डॉक्टरेट पदवी आहे. मॅट मॅकीने हर्झिगला विचारले की तू ट्रान्सजेंडर महिला आहेस का? हर्झिगने हो असे उत्तर दिल्यानंतर मॅट मॅकी यांनी कहरच केला. त्यापुढे ते म्हणाले की, मग तुला लिंग आहे का? मॅट मॅकी यांचा प्रश्न हा अतिशय विचित्र असल्याचे सभागृहात उपस्थित असलेल्या लोकांच्या हावभावावरुन लगेच लक्षात आले. यावरही संयम ठेवून स्वतःची ओळख सांगत हर्झिगने ठणकावले, “मी एक आरोग्य सेवा देणारा देणारी व्यावसायिक आहे. एक डॉक्टर आहे. कृपया माझ्याशी बोलताना ही गोष्ट ध्यानात ठेवा आणि पुढचा प्रश्न विचारा”
एनबीसी न्यूज या संकेतस्थळाने ही बातमी दिली असून त्यांनी हर्झिग आणि मॅट मॅकी यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी हर्झिगने तिची भावना सविस्तर विषद केली. हर्झिग म्हणाली, माझ्या आयुष्यातील हा सर्वात मोठा सार्वजनिक अपमानास्पद प्रसंग होता. मला यापेक्षा वेगळ्या प्रश्नांची अपेक्षा होती. या प्रसंगानंतर अमेरिकेतील सोशल मीडिया आणि डेमोक्रॅट्स पक्षाच्या लोकांनी रिपब्लिकन्सवर टीका करण्याची संधी साधली. मात्र मॅट मॅकी यांच्याशी एनबीसीचा संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांची याबाबतची पुढील बाजू समजू शकलेली नाही.
हे वाचा >> हॉलीवूडची सेक्स सिम्बॉल म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री Raquel Welch चं निधन
अल्पवयीन मुलांचे लिंगपरिवर्तनाला बंदी आणणारा कायदा
अर्कान्सास संसदेचे विधेयक क्र. १९९ या महिन्यात सादर करण्यात आले आहे. हे विधयेक डॉक्टरांना अल्पवयीन मुला-मुलींची लिंग पुष्टी करण्याच्या सेवेला प्रतिबंधित करणारे आहे. अल्पवयीन मुलांचे लिंगबदल किंवा हार्मोन बदल करणारी शस्त्रक्रिया रोखण्यासाठी हे विधेयक आणले जात आहे. तसेच एखाद्या डॉक्टरने अल्पवयीन मुला-मुलीवर अशा प्रकारची शस्त्रक्रिया किंवा उपचार केले तर त्या मुला-मुलीला वयाची १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर ३० व्या वर्षांपर्यंत संबंधित डॉक्टराच्या विरोधात खटला दाखल करण्याची मुभा देखील या विधेयकाद्वारे देण्यात येत आहे.
अर्कान्सास मधील आरोग्याशी संबंधित संस्था, लहान मुलांच्या आरोग्याच्या विशेषज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ या विधेयकाचा विरोध करत आहेत. २०२१ साली अल्पवयीन मुलांची लिंग पुष्टी करणाऱ्यांवर कायदा बनवून बंदी घालणारे अर्कासान्स हे पहिले राज्य ठरले होते. मात्र फेडरल न्यायालयाने या कायद्याला स्थगिती दिली होती. या कायद्यावर अर्कासान्सच्या सिनेट न्यायिक समितीसमोर काही लोकांच्या साक्ष घेतल्या जात होत्या. ज्यामध्ये हर्झिग सहभागी झाली होती. तिने या कायद्याला विरोध केला आहे.
खासदार मॅकी यांनी विचारलेल्या प्रश्नाचा व्हिडिओ अमेरिकेत व्हायरल झाला असून अनेक लोक हर्झिगला पाठिंबा देत आहेत. याबाबत हर्झिगने समाधान व्यक्त केले. ती म्हणाली, “लोकं माझ्यासारख्या लोकांच्या पाठिशी उभे राहत आहेत. मी आशादायक बाब आहे.”