पंजाब येथील पठाणकोट येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात माजी आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू, सुभेदार मेजर (निवृत्त) फतेह सिंग (५१) यांना वीरमरण आले. लष्कराच्या सुरक्षा दलामध्ये सुभेदार म्हणून कार्यरत असलेल्या फतेह यांनी १९९५मध्ये दिल्लीत झालेल्या पहिल्या राष्ट्रकुल नेमबाज अजिंक्यपद स्पध्रेत भारताला एक सुवर्ण व एक रौप्यपदक पटकावून दिले होते. राष्ट्रीय रायफल संघटनेने त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आपल्या मातृभूमीच्या संरक्षणासाठी फतेहसिंग यांनी प्राणांची आहुती दिली. फतेहसिंग हे ‘डिफेन्स सेक्युरिटी कोअर’मध्ये लष्करासाठी सेवा बजावत होते.