नवी दिल्ली : सैन्यदलांचे आधुनिकीकरण करून राष्ट्रीय सुरक्षा अधिक बळकट करण्यावर नवे सरकार भर देईल. देशांतर्गत संरक्षण उत्पादनात लक्षणीय वाढ झाली असून त्यांचा देशाला फायदा होईल, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी सांगितले. प्रत्येक आव्हानाला तोंड देण्यासाठी सैन्यदले सज्ज असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> अजित डोवाल तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी; भारत सरकारकडून नियुक्तीपत्र जाहीर

राजनाथ सिंह यांनी गुरुवारी संरक्षणमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. पुढील पाच वर्षांसाठी आपले ध्येय सांगताना सिंह म्हणाले, ‘‘सध्या संरक्षण निर्यात २१,०८३ कोटी असून २०२८-२९ पर्यंत त्यांत ५० हजार कोटी रुपयांपर्यंत वाढ करण्यासाठी सरकार तत्परतेने काम करेल. सैन्यदलांना अत्याधुनिक शस्त्रांनी सुसज्ज केले जात असून प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्यासाठी ते सज्ज आहेत.’’

संरक्षणसज्जता वाढवण्यासाठी आणि संरक्षणामध्ये ‘आत्मनिर्भरता’ आणण्यासाठी आणि प्रमुख योजना आणि उपक्रमांच्या जलदगतीने अंमलबजावणी करण्यासाठी नियमित आढावा बैठका घेतल्या जातील, असे संरक्षणमंत्र्यांनी सांगितले. पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच सिंह यांनी मंत्रालयाच्या पहिल्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यावरील बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Armed forces ready to face all challenge says defense minister rajnath singh zws