भारतीय लष्कर सीमेवर होणाऱ्या कोणत्याही स्वरुपाच्या कारवाईसाठी सदैव तयार आहे. कोणी काहीही म्हणो त्याचा लष्करावर परिणाम होणार नाही, असे पाकिस्तानला प्रत्युत्तर देताना उत्तर कमांडचे कमांडिंग ऑफिसर लेफ्ट. जन. रणबीर सिंग यांनी स्पष्ट केले आहे. पाकिस्तानने काही दिवसांपूर्वी भारताला डिवचताना एका सर्जिकल स्ट्राइकच्या बदलल्यात दहा सर्जिकल स्ट्राइक्स करण्याचा इशारा दिला होता.


सिंग म्हणाले, घुसखोरांना रोखण्यासाठी सीमेवरील विविध भागात आपल्या वीजवाहक तारांचे कुंपण सातत्याने कार्यरत आहेत. या वीजवाहक कुंपणाचा खुपच चांगला परिणाम होत असून त्यामुळे मोठ्या प्रमाणावर दहशती कारवाया आणि घुसखोरांना रोखण्यात आपल्याला यश आले आहे.

लष्काराला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, संपूर्ण आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून दहशतवाद्यांसाठी उभारण्यात आलेल्या पायाभूत सुविधांमध्ये अद्याप कुठलाही बदल झालेला नाही. दहशतवादी कारयावांसाठी त्यांना पाककडून रसद पुरवलीच जात आहे. त्यामुळेच पाकिस्तानातून दहशतवादाचे प्रशिक्षण घेऊन आलेल्या घुसखोरांना रोखण्यात अडचणी येत आहेत. याला सर्वस्वी पाकिस्तानच जबाबदार असल्याचेही यावेळी ले. जन. रणबीर सिंग यांनी सांगितले.

Story img Loader