लष्कराने एएनआय या वृत्तसंस्थेद्वारे एक व्हीडीओ प्रसिद्ध केला आहे. या माध्यमातून विविध अंतरावर रॉकेटचा मारा करु शकणारी ‘पिनाक’ आणि ‘स्मर्च’ ही रॉकेट लॉन्चर सज्ज असल्याचं सांगितलं आहे. ही लॉन्चर आसाममध्ये आणून ठेवल्याचंही लष्कराने स्पष्ट केलं आहे. याचा अर्थ अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर चीनने काही आगळीक केल्यास हे रॉकेट लॉन्चर कधीही तैनात केले जाऊ शकतात असा संदेशच एकप्रकारे लष्कराने चीनला दिला आहे.

गेले काही महिने लडाख क्षेत्रात चीनच्या सीमेवर मोठ्या घडामोडी सुरु आहेत. चीनबरोबरच्या या संघर्षात आपले काही जवान-अधिकारी हे शहीद झाले, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात सैन्य हे लडाख परिसरात आणि प्रत्यक्ष सीमेवर सज्ज ठेवण्याची वेळ आली. असं असताना देशाच्या ईशान्य भागात चीनच्या सीमेवर चीन लष्कराच्या हालचाली वाढल्याची गोष्ट समोर आली आहे.

ईशान्येकडील सीमाभागात चीनी सैन्याच्या हालचाली वाढल्या; “प्रत्युत्तर देण्यास आम्ही सज्ज”, भारताचा चीनला इशारा!

त्यामुळे आता देशाच्या लष्कराने सुद्धा पावलं टाकायला सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून लष्कराने दोन प्रकारची रॉकेट लॉन्चर ही आसाममध्ये आणून सज्ज ठेवली आहेत. यामुळे गरज लागल्यास कधीही अरुणाचल प्रदेशामध्ये चीनच्या सीमेलगत रॉकेट लॉन्चर ही तैनात करता येणार आहेत. रॉकेट लॉन्चर यांना सज्ज करत एक प्रकारे भारताने चीनला इशारा दिला आहे.

कोणती रॉकेट लॉन्चर यंत्रणा लष्कराने सज्ज ठेवली आहेत ?

पिनाक – स्वदेशी बनावटीचे रॉकेट लॉन्चर. ५ मिनीटात सज्ज होत ३८ किलोमीटर पर्यंत मारा करण्याची क्षमता. एका लॉन्चरमध्ये १२ रॉकेट.

स्मर्च – रशियाच्या तंत्रज्ञानाचे. ५ मिनीटात शस्त्रसज्ज होत ९० किलोमीटरपर्यंत मारा करण्याची क्षमता. एक लॉन्चर ४४ सेकंदात १२ रॉकेटचा मारा करु शकते.

तेव्हा यापुढच्या काळात लडाखप्रमाणे ईशान्य भागातही लष्कराच्या हालचाली वाढल्या तर आश्चर्य वाटायला नको.

Story img Loader