विमान प्रवासात अनेकदा आजारी माणसांना तत्काळ वैद्यकीय मदतीची गरज असते. अशावेळी विमानात असलेल्या सहप्रवाशांकडून मदत केली जाते. अनेकदा वैद्यकीय क्षेत्रातील सहप्रवासी असतात. त्यामुळे त्यांच्याकडून प्राथमोपचार घेऊन पुढील उपचारांसाठी विमान उतरवलं जातं. असाच प्रकार इंडिगो विमानात घडला आहे. या विमानात लष्करातील एका डॉक्टरांनी आजारी व्यक्तीचा जीव वाचवला आहे.

१६ जून रोजी हा प्रकार चंदीगड 6E724 या विमानात घडला. या विमानात चांदीमार येथील कमांड हॉस्पिटलचे मेजर सिमरत राजदीप सिंग हेही प्रवास करत होते. हे विमान चंदीगढहून गोव्याच्या दिशेने निघाले होते. परंतु, विमानात एका २७ वर्षीय युवकाची प्रकृती बिघडली. त्यामुळे विमान मुंबईत लॅण्ड करण्यात आलं.

हेही वाचा >> ‘इंडिगो’ला वाढत्या प्रवासी संख्येने दुपटीने नफा

विमान वाहतूक कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, विमानात एका २७ वर्षीय तरुणाची प्रकृती बिघडल्याने त्याला तत्काळ वैद्यकीय उपचारांची गरज होती. त्यामुळे विमानातील कर्मचाऱ्यांनी तत्काळ निर्णय घेत विमान मुंबईत उतरवण्याचा निर्णय घेतला. त्याला हृदयविकाराचा झटकाही आला होता. तसंच, सातत्याने त्याची प्रकृती ढासाळत जात होती. दरम्यान, याच विमानात दोन डॉक्टरही प्रवास करत होते. त्यांनीही त्याच्यावर उपचार करण्यासाठी मदत केली.

हेही वाचा >> अचानक सुरु झाला धो-धो पाऊस; इंडिगो कर्मचारी प्रवाशांसाठी उभे राहिले रांगेत अन्… VIDEO पाहून वाजवाल टाळ्या

मूत्रपिंडाचा त्रास वाढल्याने प्रकृती ढासाळली

विमानातील डॉक्टरांनी परिस्थितीचे मूल्यांकन केले आणि प्रवाशाला लहान मूत्रपिंड आणि शेवटच्या टप्प्यातील तीव्र मूत्रपिंडाचा आजार असल्याचं स्पष्ट केलं. विमानाने उड्डाण केल्यानंतर मूत्रपिंडाचा त्रास अधिक वाढला. त्यांनी प्रथोमपचार करून तरुणाला मुंबईत उतरवण्यात आले आणि योग्य ती वैद्यकीय उपचार पुरवले गेले. दरम्यान, आव्हानात्मक परिस्थितीतही इंडिगो आपल्या प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि हितासाठी कटिबद्ध आहे”, असं एअरलाइनने म्हटले आहे.