जम्मू-काश्मीर येथील केरन सेक्टरमध्ये लष्कराच्या जवानांनी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा डाव उधळून लावला आणि चार दहशतवाद्यांना ठार केले आहे. शनिवारी पहाटे शालभाटी गावापासून २५ किलोमीटर अंतरावर केरन सेक्टरमधील फतेह गल्ली भागात दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. भारतीय हद्दीत प्रवेश करत असलेल्या या चार दहशतवाद्यांना भारतीय जवानांनी ठार मारले. या दहशतवाद्यांजवळून सहा एके ४७ व शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आल्याची माहिती अधिका-यांनी दिली.
केरन सेक्टरमधून भारतीय हद्दीत घुसण्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांविरुद्ध लष्कराच्या जवानांनी मोहिम सुरू केली आहे. ही मोहिम आणखी दहा दिवस चालविण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Army foils another infiltration bid in keran sector in kashmir 4 militants killed