पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जम्मू आणि काश्मीर दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर सीमेवरील हालचालींमध्ये वाढ झाली आहे. भारतीय लष्कराने गुरुवारी पहाटे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील पूंछ जिल्ह्य़ात अतिरेक्यांनी केलेला घुसखोरीचा सलग दुसरा प्रयत्न हाणून पाडला. पाकव्याप्त काश्मीरमधून काही अतिरेकी भारतीय हद्दीत घुसखोरी करू पाहत होते. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक पूंछ जिल्ह्य़ातील कृष्णगाटी येथे काही जण संशयास्पदरीत्या वावरताना दिसले. त्यांना भारतीय लष्कराने हटकले असता त्यांनी लष्करावर गोळीबार सुरू केला. भारतीय जवानांनीही त्यास चोख प्रत्युत्तर दिले आणि गुरुवारी पहाटे हा प्रयत्न हाणून पाडला, अशी माहिती कर्नल मुनीष मेहता यांनी दिली. बुधवारीदेखील घुसखोरीचा असाच प्रयत्न करण्यात आला होता.
घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने उधळला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जम्मू आणि काश्मीर दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर सीमेवरील हालचालींमध्ये वाढ झाली आहे.
First published on: 04-07-2014 at 03:58 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Army foils infiltration bid in jammu and kashmir