जम्मू काश्मीरमध्ये तैनात एका जवानाचा बराकीत छताला टांगलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही घटना बुधवारी (दि. १९) उघडकीस आली. अनिल बुरा (वय २३) असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे. तो जम्मू काश्मीर येथील मेंढरमध्ये तैनात होता. प्राथमिक तपासात त्याने आत्महत्या केल्याचे समोर येत आहे.
यापूर्वीही जम्मूमध्ये एका जवानाने आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. तणावामुळे त्याने आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले होते.
सविस्तर वृत्त लवकरच..
23 year old Army Jawan, Anil Bura from Mendhar Sector J&K was found hanging in his living barracks today
— ANI (@ANI) October 19, 2016