जम्मू- काश्मीरमधील भारत-पाक सीमेपलीकडून दोन संशयित अतिरेक्यांनी केलेला घुसखोरीचे प्रयत्न मंगळवारी भारतीय लष्कराने हाणून पाडला़  एका अतिरेक्याला कंठस्नान घालण्यात आले, तर या वेळी झालेल्या प्रचंड गोळीबारात एका भारतीय जवानालाही हौतात्म्य प्राप्त झाल़े
लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू आणि कथूआ जिल्ह्यांत हे घुसखोरीचे प्रयत्न करण्यात आल़े  जम्मूतील चकला भागातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपलीकडून सकाळी अतिरेक्यांच्या एका गटाने घुसखोरीचा प्रयत्न केला़
 त्या वेळी सतर्क नागा रेजिमेंटच्या जवानांनी त्यांच्यावर गोळीबार केला़  दोन्ही बाजूंनी भीषण गोळाबारी होऊन अखेर एका लष्करी जवानाला हौतात्म्य प्राप्त झाल़े  या माहितीला लष्कराचे प्रवक्ते एम़  मेहता यांनी दुजोरा दिला आह़े
अतिरेकी ठार
अशीच आणखी एक घटना सोमवारी रात्री करोल मत्रायन आंतरराष्ट्रीय सीमेजवळ घडली़  अतिरेक्यांच्या एका गटाकडून घुसखोरीचे प्रयत्न सुरू असताना सीमा सुरक्षा दलाच्या ६८ बटालियनने त्यांना थापविण्यासाठी गोळीबार केला़  त्यात एका अतिरेक्याला ठार करण्यात आल़े  त्यामुळे अन्य अतिरेकी पाकिस्तानकडे निघून गेल़े  ठार झालेल्या अतिरेक्याचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे, असे सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितल़े
जेटली यांची संसदेत माहिती
केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर आतापर्यंत पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमध्ये १९ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. मात्र भारतीय जवानांनी त्याला प्रत्येक वेळी चोख प्रत्युत्तर दिले आहे, असे राज्यसभेत मंगळवारी सांगण्यात आले.
आपण त्यांच्यापुढे मान तुकवलेली नाही आणि सरकार त्यांच्यापुढे मान तुकवू देणार नाही, असे संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले. मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी सातत्याने यूपीए सरकार दुबळे असल्याची टीका करीत होते, तर आता सरकार शस्त्रसंधीच्या उल्लंघनापुढे मान का तुकवीत आहे, असे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद म्हणाले तेव्हा जेटली यांनी प्रत्युत्तर दिले.
मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची प्रथम भेट घेतली तेव्हाच मोदी यांनी सीमेवरील शस्त्रसंधीचे महत्त्व स्पष्ट केले होते. प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर २६ मे ते १७ जुलै या कालावधीत १९ वेळा शस्त्रसंधीचे     उल्लंघन झाले, असे जेटली म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा