काश्मीरच्या उरी क्षेत्रात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी सैन्याने शनिवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन करून केलेल्या बेछूट गोळीबारात भारताचा एक जवान व अन्य महिला ठार झाली.
उरी क्षेत्राजवळच्या कमलकोट भागात पाकिस्तानी सैन्याने सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास गोळीबार केला. त्यामध्ये एक जवान व महिला ठार झाली.
भारताच्या सैनिकांनी पाकिस्तानच्या या आगळिकीस चोख प्रत्युत्तर दिल्याची माहिती लष्कराचे माहिती अधिकारी कर्नल ब्रिजेश पांडे यांनी दिली.

Story img Loader