मणीपूरमधील चंदेल जिल्ह्य़ात लष्करी ताफ्यावर हल्ला करून १८ अधिकाऱ्यांना ठार मारल्याप्रकरणी सुरक्षा दलांनी शुक्रवारपासून व्यापक शोधमोहीम सुरू केली. या हल्ल्यात एका संशयित दहशतवादीही ठार झाला तसेच अन्य ११ जण जखमी झाले होते. गुरुवारी झालेल्या या हल्ल्यानंतर घनदाट जंगलात घटनास्थळी गेलेले पोलीस अधिकारी परतले असून त्यांनी  मृतदेहही परत आणल्याची माहिती चंदेलच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

Story img Loader