जम्मू-काश्मीर सीमेलगत कुपवाडा जिल्ह्य़ात प्रत्यक्ष ताबा रेषेलगत  दहशतवाद्यांना बाहेर काढण्याच्या मोहिमेत एक जवान धारातीर्थी पडला. रविवारपासून सुरू झालेल्या मोहिमेत लष्कराचे तीन जवान धारातीर्थी पडले असून पाच अतिरेकी मारले गेले आहेत. बारोन गली, कालारूस येथे अतिरेक्यांची घुसखोरी चालू असून तेथे रात्री एकमेकांवर गोळीबारात भारतीय जवानाचा मृत्यू झाला. अजून तीन अतिरेकी सापळ्यात आले असून त्यांच्यावर कारवाईची मोहीम सुरू आहे.

Story img Loader