जम्मू-काश्मीरमधील गांदरबाल जिल्ह्यातील लष्करी छावणीमध्ये एका जवानाने सहकारी जवानांवर गोळीबार करून नंतर स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. गुरुवारी पहाटे घडलेल्या या घटनेमध्ये पाच जवान मृत्युमुखी पडले.
लष्कराच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार गोळीबार करणारा जवान राष्ट्रीय रायफल्स दलात कार्यरत होता. गुरुवारी पहाटे त्याने छावणीमध्ये येऊन तिथे झोपलेल्या जवानांवर बेछूट गोळीबार केला. त्यात पाच जणांचा जागीत मृत्यू झाला. गोळीबार करणाऱया जवानाने त्यानंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.
साफापोरामधील राष्ट्रीय रायफल्सच्या छावणीमध्ये हा प्रकार घडला. गोळीबार करणारा जवाना रात्रपाळीमध्ये सुरक्षेसाठी तैनात होता. मात्र, त्याने दोन ते तीनच्या दरम्यान छावणीमध्ये येऊन सहकाऱयांवरच गोळीबार केला. गोळीबारामध्ये अन्य एक जवान जखमी झाला असल्याचे समजते.
काश्मीरमध्ये जवानाचा सहकाऱयांवर गोळीबार, पाच ठार
जम्मू-काश्मीरमधील गांदरबाल जिल्ह्यातील लष्करी छावणीमध्ये एका जवानाने सहकारी जवानांवर गोळीबार करून नंतर स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली.

First published on: 27-02-2014 at 10:21 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Army man shoots five colleagues dead before killing himself in jk