जम्मू-काश्मीरमधील गांदरबाल जिल्ह्यातील लष्करी छावणीमध्ये एका जवानाने सहकारी जवानांवर गोळीबार करून नंतर स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. गुरुवारी पहाटे घडलेल्या या घटनेमध्ये पाच जवान मृत्युमुखी पडले.
लष्कराच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार गोळीबार करणारा जवान राष्ट्रीय रायफल्स दलात कार्यरत होता. गुरुवारी पहाटे त्याने छावणीमध्ये येऊन तिथे झोपलेल्या जवानांवर बेछूट गोळीबार केला. त्यात पाच जणांचा जागीत मृत्यू झाला. गोळीबार करणाऱया जवानाने त्यानंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.
साफापोरामधील राष्ट्रीय रायफल्सच्या छावणीमध्ये हा प्रकार घडला. गोळीबार करणारा जवाना रात्रपाळीमध्ये सुरक्षेसाठी तैनात होता. मात्र, त्याने दोन ते तीनच्या दरम्यान छावणीमध्ये येऊन सहकाऱयांवरच गोळीबार केला. गोळीबारामध्ये अन्य एक जवान जखमी झाला असल्याचे समजते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा