एक नागरिकही मृत्युमुखी
प्रत्यक्ष ताबा रेषेवर गेल्या काही दिवसात पाकिस्तानच्या कारवाया वाढल्या असून आज येथून १६० कि.मी. अंतरावर असलेल्या तंगधर येथे सशस्त्र अतिरेक्यांनी प्रत्यक्ष ताबा रेषेनजीक लष्कराच्या छावणीत घुसून गोळीबार केला. यावेळी चकमकीत सर्व हल्लेखोरांना लष्काराच्या जवानांनी ठार केले. मृतांमध्ये एका नागरिकाचाही समावेश आहे.
छावणीच्या मागच्या बाजूने अतिरेक्यांनी सकाळी सव्वासहा वाजता हल्ला केला, त्यामुळे काही वाहने पेटली. तंगधर भागात लष्करी छावणीच्या दिशेने कालसुरी दरीतून गोळीबार करण्यात आला. सात तास ही चकमक सुरू होती. लष्कराने दिलेल्या माहितीनुसार तीन अतिरेकी यात ठार झाले असून एक नागरिकही मारला गेला आहे. अतिरेक्यांकडे लहान अग्निशस्त्रे होती, शिवाय युबीजीएलही होते. कुपवाडाचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक एजाझ अहमद यांनी सांगितले की, तीन अतिरेकी छावणीत घुसले होते. तंगधर हे ठिकाण कुपवाडा जिल्ह्यात प्रत्यक्ष ताबा रेषेनजीक आहे व तेथून यापूर्वीही घुसखोरीचे अनेक प्रयत्न झाले आहेत.
एक जवानही या चकमकीत जखमी झाला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तीन एके रायफली व दारूगोळा या मृत अतिरेक्यांकडे सापडला आहे. ही चकमक सुरू असून पाकिस्तानच्या जैश ए महंमद या दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. एका स्थानिक वृत्तवाहिनीला केलेल्या दूरध्वनीत जैशच्या प्रवक्तयाने ते तीनही अतिरेकी आमचेच होते व त्यांनी हल्ला केला असे म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा