लष्करातील शिस्त मोडत जवानाने कर्नल पदावरील अधिकाऱयासोबत गैरवर्तणूक केल्याप्रकरणी चौकशीचे (कोर्ट ऑफ इन्क्वायरी) आदेश देण्यात आले आहेत. लष्करातील अधिकाऱयासोबत गैरवर्तणूक केल्याची ही गेल्या पाच दिवसांतील दुसरी घटना आहे. 
राष्ट्रीय छात्र सेनेचे अधिकारी कर्नल बी. एम. हन्स्रा यांच्याशी हवालदार पदावरील जवानाने गैरवर्तणूक केली. कामावर येण्याची वेळ न पाळल्यामुळे विभागाच्या अधिकाऱयाने संबंधित हवालदाराला फटकारले होते. त्यानंतर त्याने हन्स्रा यांच्यासोबत गैरवर्तणूक केल्याचे सूत्रांनी सांगितले.
संबंधित हवालदार शिख लाइट इन्फंट्रीमधील असून, सध्या तो प्रतिनियुक्तीवर राष्ट्रीय छात्र सेनेच्या लष्कर विभागात कार्यरत आहेत. कर्नल दर्जाच्या अधिकाऱयाकडून या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पाच दिवसांपूर्वी मीरतमध्ये काही जवानांनी अधिकाऱयाला मारहाण केली होती. मुष्टियुद्धाच्या सामन्यानंतर झालेल्या वादावादीतून ही मारहाण करण्यात आली होती.