पीटीआय, जम्मू : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला जम्मूच्या दोडा जिल्ह्यात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यात कॅप्टन दीपक सिंह यांना वीरमरण आले असून एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात सैनिकांना यश आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवगढ-असर पट्ट्यात लपलेल्या परदेशी दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी संयुक्त पथकाने शोधमोहीम हाती घेतली होती. या मोहीमेदरम्यान घनदाट जंगलाच्या परिसरातून दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. यात कॅप्टन सिंह गंभीर जखमी झाले. लष्कराच्या रुग्णालयात उपचारादरम्य़ान त्यांचा मृत्यू झाला. सुरक्षा दलांनी चकमकीच्या ठिकाणाहून एक एम ४ रायफल जप्त केली. घटनास्थळी रक्ताने माखलेल्या चार बॅगा आढळल्यामुळे सुरुवातील चार दहशतवादी ठार झाल्याचा अधिकाऱ्यांचा समज झाला. मात्र तपासाअंती केवळ एक दहशतवादी ठार झाल्याचे स्पष्ट झाले. चकमकीत एक नागरिक जखमी झाल्याचे वृत्त आहे. गेल्या काही दिवसांत उधमपूर-दोडा-किश्तवाड भागात झालेली ही चौथी चकमक आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Army terrorist encounter in doda district amy