केरन येथे पाकिस्तानी सैन्याने घुसखोरी करून शस्त्रसंधीचा भंग केल्याच्या पाश्र्वभूमीवर भारताने त्याविरोधात केलेल्या कारवाईस पंधरवडा उलटून गेल्यानंतर केरनमध्ये नक्की काय झाले, या मुद्यावरून  संशयाचे ढग उत्पन्न झाले आहेत.
८ ऑक्टोबर रोजी केरनमधील लष्करी कारवाई संपुष्टात आल्यानंतरही नंतर पाच दिवस त्यात खंड पडलेला नव्हता. शालभटू या गावी सीमा सुरक्षा दल आणि लष्कराचे अधिकारी संयुक्तरीत्या पोहोचेपर्यंत ही कारवाई सुरू होती.  केंद्र सरकार आणि राज्य सुरक्षा संस्थांनी केरन कारवाईप्रकरणी सादर केलेल्या अहवालाबद्दल काही शंका निर्माण झाल्या आहेत. मात्र, केरन कारवाईसंबंधी निर्माण झालेल्या सर्व शंकांचे लष्कराने स्पष्टपणे खंडन केले आहे.