नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांना २१ मेपर्यंत अटक करा, अन्यथा आम्हाला काही ठोस निर्णय घ्यावा लागेल, अशी नवी भूमिका आंदोलक कुस्तीगिरांनी ३१ सदस्यीय समितीने दिलेल्या सल्ल्यानंतर घेतली आहे. आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आंदोलक कुस्तीगिरांनी एक नऊ सदस्यीय आणि दुसरी ३१ सदस्यीय अशा दोन समित्यांची स्थापना केली आहे. यापैकी ३१ सदस्यीय समितीने  आम्हाला ब्रिजभूषण यांना २१ मेपर्यंत अटक करा अशी भूमिका घ्यायला  सांगितल्याचे विनेश फोगट म्हणाली. त्याच वेळी शेतकरी संघटनेचा आमच्या आंदोलनावर प्रभाव नसल्याचेही विनेशने सांगितले.

आंदोलक कुस्तीगिरांची रविवारी भारतीय किसान संघटनेचे प्रवक्ते राकेश टिकैत, खाप महापंचायत २४ चे प्रमुख मेहर सिंह आणि संयुक्त किसान मोर्चाचे बलदेव सिंग सिरसा यांनी भेट घेतली. प्रत्येक खापचे सदस्य रोज सकाळी येथे येतील. दिवसभर आंदोलकांबरोबर राहतील आणि संध्याकाळी परत येतील, असे टिकैत यांनी सांगितले. तसेच कुस्तीगिरांची समिती आंदोलनाबाबतचे निर्णय घेईल आणि आम्ही बाहेरून आंदोलनाला पाठिंबा देऊ, असेही टिकैत म्हणाले. आम्ही २१ मे रोजी एका बैठकीचे आयोजन केले आहे. तोपर्यंत सरकारने काही निर्णय न दिल्यास आम्ही पुढील रणनीती आखू, असेही त्यांनी सांगितले. कुस्तीगिरांच्या मागणीनुसार ब्रिजभूषण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी कलम १६१ नुसार सात महिला तक्रारदारांचे जबाब नोंदवले आहेत. आता कलम १६४ नुसार दंडाधिकाऱ्यांसमोर त्यांचे जबाब नोंदवणे बाकी आहे.

Image of Allu Arjun House
Allu Arjun : अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला करणाऱ्या सहा आरोपींना जामीन, हल्लेखोरांशी मुख्यमंत्र्यांचा संबंध असल्याचा आरोप
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Pratap Sarangi and Mukesh Rajput
BJP MP Pratap Sarangi : राहुल गांधींनी ‘धक्का’ दिल्याचा आरोप करणारे प्रताप सारंगी आणि मुकेश राजपूत कोण आहेत? जाणून घ्या!
Vishwanath Baburao Chakote , Former MLA Complaint ,
काँग्रेसच्या माजी आमदाराची शेतजमीन भाऊ, पुतण्याने लाटली; सोलापुरात गुन्हा
Bharat Gogawale, Aditi Tatkare, Raigad Guardian Minister, Raigad ,
रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेना आमदारांचे लॉबींग
badshah traffic violation allegation
बादशाहवर वाहतुकीचे नियम मोडल्याने झाली कारवाई? रॅपर स्वतः स्पष्टीकरण देत म्हणाला, “माझ्याकडे तर…”
Narendra Bhondekar, Narendra Bhondekar Bhandara ,
फडणवीसांचाच प्रस्ताव स्वीकारायला हवा होता… शपथविधीनंतर शिंदेंच्या आमदाराकडून उघड…
High Court orders Mumbai Police regarding atrocity case against Nawab Malik Mumbai news
मलिक यांच्याविरोधातील ॲट्रोसिटी प्रकरणाचा तपास चार आठवड्यांत पूर्ण करा; उच्च न्यायालयाचे मुंबई पोलिसांना आदेश
Story img Loader