एक आलिशान कॅसिनो रिसॉर्ट उडवण्याची धमकी फेसबुकवरील संदेशाच्या माध्यमातून दिल्याप्रकरणी सिंगापूरस्थित १३ वर्षीय भारतीय विद्यार्थ्यांला अटक करण्यात आली आहे. सदर विद्यार्थ्यांने आपण सिंगापूर सोडताना ‘सूड उगवणार असल्याचे’, ‘सर्वत्र थुंकणार असल्याचे’ आणि येथील मरिना बे सॅंडस् रिसॉर्ट बॉम्बने उडविणार असल्याचे फेसबुकवरील संदेशात म्हटले होते. या संदेशात त्याने सिंगापूरवर टीका करणारा मजकूर प्रसिद्ध केला होता. हा विद्यार्थी ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल या शाळेचा विद्यार्थी असून दहशतवादी हल्ल्याची धमकी दिल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्य़ाबद्दल त्याला ५ वर्षे कारावास किंवा १ लाख डॉलर्सचा दंड किंवा या दोन्ही शिक्षा होऊ शकतात, अशी माहिती सिंगापूर पोलिसांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा