इस्लामाबाद : पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने मंगळवारी माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरुद्ध अवमान प्रकरणात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे.
पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे (पीटीआय) प्रमुख इम्रान खान आणि पक्षाचे माजी नेते आणि माजी मंत्री फवाद चौधरी, असद उमर यांनी निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्तांविरुद्ध अभद्र भाषा वापरल्याबद्दल अवमानाची कारवाई सुरू करण्यात आली आहे.