Arrest warrant issued against Gautam Adani : अदाणी समूहाचे सर्वेसर्वा आणि भारतातले प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदाणी यांच्याविरोधात न्यूयॉर्कमध्ये अटक वॉरंट लागू करण्यात आलं आहे. त्यामुळे गौतम अदाणी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. न्यूयॉर्कच्या न्याय विभागाच्या उप सहाय्याक अॅटर्नी जनरल लिसा एच मिलर यांनी गौतम अदाणी आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांवर भारतीय अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा आरोप केला आहे. अमेरिकन गुंतवणूकदारांची फसवणूक करुन भ्रष्टाचार करण्यात आला असाही ठपका त्यांनी ठेवला आहे. सोलार एनर्जीच्या प्रकल्पात करार करताना भ्रष्टाचार करण्यात आला आहे असंही त्यांनी नमूद केलं आहे.

लाचखोरीचा आरोप आणि अदाणींचे शेअर्स घसरले

गौतम अदाणी यांच्याबाबतची ही बातमी सकाळी जेव्हा आली तेव्हा त्याचा परिणाम अदाणी समूहाच्या शेअर्सवर झाला. अदाणी समूहाच्या शेअर्समध्ये १० ते २० टक्क्यांची घसरण दिसून आली तर अदाणी एंटरप्रायझेसचे शेअर्सही घसरले आहेत. अदाणी पोर्ट आणि सेझ, अदाणी पॉवर आणि एनर्जी ग्रीनचे शेअर्सही घसरले.

Sharad Pawar on Jarange Patil
Sharad Pawar : मनोज जरांगेंनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “मला आनंद, कारण…”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
viral video of andhra pradesh
Viral Video : नवजोडप्याला लग्नाचा आहेर देताना मित्राचा करुण अंत; व्हायरल VIDEO मुळे खळबळ!
Reddy was a second-year student at Kansas State University
बंदूक स्वच्छ करायला घेतली अन् छातीतच लागली गोळी; भारतीय विद्यार्थ्याचा अमेरिकेत वाढदिवशी मृत्यू!
Harshita Brella’s sister shows her photo and a screenshot of the last WhatsApp message sent to her by her father. (Photo: Farhan Sayeed Masoodi)
WhatsApp वरचा एक न वाचलेला मेसेज, दिल्लीतल्या विवाहितेची लंडनमध्ये झालेली हत्या कशी उलगडली? काय आहे प्रकरण?

नेमकं काय आहे प्रकरण?

अदाणी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदाणी यांच्यावर अमेरिकेच्या विधि विभागाकडून भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यासंदर्भात अदाणींवर गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. खुद्द गौतम अदाणी व त्यांचा पुतण्या सागर अदाणी यांच्यासह एकूण सात जणांचा यात समावेश असल्याचा हा आरोप आहे. या सगळ्यांनी मिळून सौर ऊर्जा वितरणाचं कंत्राट मिळवण्यासाठी काही सरकारी अधिकाऱ्यांना २ हजार ०१९ कोटी रूपयांची (२६५ दशलक्ष डॉलर्स) लाच देऊ केली. अदाणी व अदाणी ग्रीन एनर्जीमधील कार्यकारी अधिकारी विनीत जैन यांनी हा सगळा प्रकार कर्जदार व गुंतवणूकदारांपासून लपवून ठेवला व त्यातून ३ अब्ज डॉलरपेक्षा अधिक कर्ज व रोखे गोळा केले, असे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत.

हे पण वाचा- Gautam Adani : अदाणी प्रकरणावर भाजपाचा राहुल गांधींवर पलटवार; म्हणाले, “चारपैकी एकाही राज्यात…”

काय आहे अदाणींच्या निवेदनात?

दरम्यान, अदाणी समूहाकडून जारी करण्यात आलेल्या स्पष्टीकरणाच्या निवेदनात भ्रष्टाचाराच्या सर्व आरोपांचं खंडन करण्यात आलं आहे. “अमेरिकेच्या विधी विभागाकडून ‘अदाणी ग्रीन्स’च्या संचालकांवर करण्यात आलेले सर्व आरोप निराधार असून आम्ही ते सर्व आरोप फेटाळत आहोत”, असं या निवेदनात सुरुवातीलाच नमूद करण्यात आलं आहे. “अमेरिकेच्या विधी विभागानंच नमूद केल्याप्रमाणे अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये दाखल करण्यात आलेले गुन्हे तोपर्यंत फक्त आरोप ठरतात, जोपर्यंत ते सिद्ध होत नाहीत. तोपर्यंत संबंधित आरोपी हा निर्दोषच असतो. या प्रकरणात आम्ही शक्य त्या सर्व कायदेशीर बाबींची विचार करत आहोत”, असंही या निवेदनात अदाणी समूहाकडून सांगण्यात आलं आहे.