भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना विरोध करणाऱ्यांनी पाकिस्तानात चालते व्हावे, असे वादग्रस्त विधान केल्याबद्दल भाजप नेते गिरीराजसिंह पुरते अडचणीत सापडले आहेत. या वक्तव्याबद्दल गिरीराज यांच्याविरोधात आज(बुधवार) न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे.
बेजबाबदारपणे वादग्रस्त वक्तव्ये करणाऱयांवर मोदी नाराज
वादग्रस्त विधानाबद्दल मंगळवारी निवडणूक आयोगाने गिरीराज यांच्यावर प्रचार बंदी घातली तसेच त्यांच्याविरोधात देवघर जिल्ह्य़ात मोहनपूर येथे प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आला. त्यानंतर आज उपविभागीय न्यायालयाने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले. त्यामुळे गिरीराज यांना अटक कोणत्याही क्षण अटक होऊ शकते. प्रचारबंदीबरोबरच गिरीराज यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे. त्यामुळे गिरीराज यांना हे प्रकरण चांगलेच भोवले आहे. 
पक्षाने दटावल्यानंतरही गिरीराज पुन्हा बडबडले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा