विवाहबाह्य संबंधातून हत्या झाल्याचे अनेक प्रकार उजेडात येतात. परंतु, बिहारमध्ये एक वेगळाच प्रकार उजेडात आला आहे. नुकतंच लग्न झालेल्या एका जोडप्याने पोलीस कोठडीतच आत्महत्या केली आहे. आत्महत्येचं वृत्त समजताच स्थानिक रहिवाशांनी शुक्रवारी पोलीस ठाण्यावरच हल्ला चढवला. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

तरौना गावातील एकाने आपल्या अल्पवयीन मेहुणीशी लग्न केलं. ही मेहुणी अवघ्या १४ वर्षांची आहे. आपल्या पतीने अल्पवयीन बहिणीशी लग्न केल्याचं समोर येताच पत्नीने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार या जोडप्याला अटक करण्यात आली. परंतु, तुरुंगात गेल्यानंतर या जोडप्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

Cash theft of four lakhs by breaking the door of the clothing store pune news
वस्त्रदालानाचा दरवाजा उचकटून पावणेचार लाखांची रोकड चोरी
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
violence erupts in manipur after recovery of bodies
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; तीन मृतदेह सापडल्यानंतर नागरिक संतप्त; राजकीय नेत्यांच्या घरांवर हल्ले
husband of former BJP corporator, kidnapping,
पिंपरी : अपहरण, मारहाण प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविकेचा पती, माजी स्वीकृत सदस्यासह ११ जणांवर गुन्हा
Ganja smuggling near Mohol, Solapur, Ganja,
सोलापूर : मोहोळजवळ गांजाची तस्करी; दोन महिलांसह चौघे अटकेत
scammer pretending to be police officer calls real cop
‘शिकारी खुद यहां शिकार हो गया’, सायबर चोरट्याचा पोलिसाला गंडा घालण्याचा प्रयत्न; नंतर झालं असं काही
Kashmiri Girl Suicide
Kashmiri Girl Suicide : बॉयफ्रेंड नीट बोलत नाही म्हणून बँक ऑफ अमेरिकेतील काश्मिरी तरुणीची हैदराबादमध्ये आत्महत्या

या जोडप्याने आत्महत्या केल्याचं समजताच गावकरी पोलीस ठाण्यात जमा झाले. या रहिवाशांनी पोलीस ठाण्याची तोडफोड केली. एवढंच नव्हे तर संतप्त जमावाने पोलीस ठाण्याच्या आतील इमारतीची जाळपोळ केली आणि पोलिसांवर दगडफेक केली. हिंसाचारात जखमी झालेल्या तीन पोलिसांपैकी एक असलेले अररियाचे सहाय्यक पोलिस अधीक्षक रामपुकर सिंग म्हणाले, “गावकरी पोलिसांचे म्हणणे ऐकायला तयार नव्हते आणि त्यांनी आमच्यावर हल्ला केला.” पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला, ज्यात दोन जण जखमी झाले.

जोडप्याची हत्या?

परंतु, या जोडप्याचा मृत्यू आत्महत्येमुळे नाही तर पोलिसांच्या मारहाणीत झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. अररियाचे पोलिस अधीक्षक डॉ. अमित रंजन यांनी हा दावा फेटाळून हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचं सांगितलं. तसंच, पोलीस ठाण्यावर हल्ला केल्यामुळे १९ जणांना अटक केल्याचंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं आहे.