अमेरिका बेचिराख करण्यासाठी आपण अमेरिकेत आलो होतो आणि अल कायदाने फेडरल रिझव्र्ह बँक उडविण्यासाठी आखलेल्या बॉम्बकटाची धुरा आपणच पेलली होती, अशी कबुली काझी महम्मद रिझवानुल अहसान नफिस या २१ वर्षीय बांगलादेशी तरुणाने न्यूयॉर्क न्यायालयात गुरुवारी दिली.
एक हजार पौंड वजनाच्या या बॉम्बने सर्वात भीषण नरसंहार ओढवण्याची शक्यता होती. नफिसने सांगितल्यानुसार, जानेवारी २०१२ मध्ये तो अमेरिकेस आला. अमेरिकेतील बडे अधिकारी तसेच न्यूयॉर्क शेअर बाजारात स्फोट घडविण्यासाठी अमेरिकेतील अल कायदाच्या हस्तकांचे संपर्क क्रमांकही त्याने मिळविले होते. त्याच्याकडे बॉम्ब तयार करण्याबाबत मार्गदर्शन देणारी पुस्तिका तसेच अल कायदाचा नेता अन्वर अल अवलाकी याच्या भाषणांच्या प्रती होत्या. अवलाकी नंतर दहशतवादविरोधी कारवाईदरम्यान मारला गेला.
आपण अमेरिका नष्ट करण्याच्या निर्धाराने आलो होतो आणि मॅनहट्टनमधील फेडरल रिझव्र्ह बँकेत स्फोट घडविण्याचा आपला कट होता. त्यामुळे अमेरिकेच्या अर्थकारणाला हादरा बसेल, असा आपला होरा होता, असे नफिसने लेखी कबुली जबाबात म्हटले आहे. आपण आणि आपल्या साथीदाराने तो बॉम्ब तेथे ठेवला. दूरनियंत्रकाद्वारे त्या बॉम्बचा जर स्फोट घडविता आला नाही तर बॉम्बस्फोटात स्वतला उडवून द्यायचा पर्यायी आत्मघातकी कटही आम्ही आखला होता. प्रत्यक्षात दूरनियंत्रकाद्वारे वारंवार प्रयत्न करूनही तो बॉम्ब फुटला नाही आणि माझ्या संशयास्पद हालचालींमुळे मी पकडलो गेलो, असे नफिसने म्हटले आहे.
न्यूयॉर्क बॉम्बकटाची बांगलादेशी तरुणाकडून कबुली
अमेरिका बेचिराख करण्यासाठी आपण अमेरिकेत आलो होतो आणि अल कायदाने फेडरल रिझव्र्ह बँक उडविण्यासाठी आखलेल्या बॉम्बकटाची धुरा आपणच पेलली होती, अशी कबुली काझी महम्मद रिझवानुल अहसान नफिस या २१ वर्षीय बांगलादेशी तरुणाने न्यूयॉर्क न्यायालयात गुरुवारी दिली.
First published on: 09-02-2013 at 05:06 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arrested bangladesh man accepts the plan of new york bomb blast