पीटीआय, नवी दिल्ली
G20 Summit Delhi 2023 जी २० परिषदेसाठी जागतिक नेत्यांचे शुक्रवारी दिल्लीत आगमन झाले. यात अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना, जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा आदींचा समावेश आहे. येत्या दोन दिवसांत या सर्वच नेत्यांबरोबर भरीव फलदायी चर्चा होईल, असा आशावाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.
विमानतळावर पारंपरीक नृत्य- संगीताने त्यांचे स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी स्वागतादरम्यान सुहास्य वदनाने वाद्यांच्या तालावर ठेका धरला. त्यांनी या विशेष स्वागताचा उल्लेख ‘एक्स’वरही केला. त्यांनी भारतीय संस्कृतीविषयी दाखविलेल्या या आपलेपणाचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नंतर ‘एक्स’वर केला.
हेही वाचा >>>जी २० परिषदेआधी पंतप्रधांनानी घेतली जो बायडन यांची भेट, कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
पाहुण्यांचे बहुभाषिक स्वागत
जी२०चे प्रतिनिधी आणि इतर आंतरराष्ट्रीय पाहुणे हे परिषदस्थळी येतील, तेव्हा त्यांचे स्वागत त्यांच्या भाषेत केले जाणार आहे. त्यानुसार जर्मनमध्ये ‘विलकोमेन’, तुर्कीमध्ये ‘होसगेल्डिनिझ’, फ्रेंचमध्ये ‘बिनेव्हेन्यु’, स्पॅनिशमध्ये ‘बिनेव्हेनिडो’, इंडोनेशियनमध्ये ‘सेलामत दातांग’ अशा शब्दांसह स्वागत फलक रंगविले आहेत.
जी २० परिषदेसाठी माझे दिल्लीत आगमन झाले आहे. आपल्यापैकी प्रत्येकालाच भेडसावणाऱ्या आव्हानांवर चर्चा करण्यासाठी आम्ही जागतिक नेत्यांशी चर्चा करणार आहोत. केवळ एकत्रितपणेच हे प्रश्न सुटू शकतात. – ऋषी सुनक, ब्रिटनचे पंतप्रधान