Arsonists attack French railways : क्रीडाविश्वात सर्वांत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांच्या यंदाच्या पर्वाला आज, शुक्रवारपासून पॅरिस येथे अधिकृतरीत्या प्रारंभ होणार आहे. परंतु, त्याआधीच फ्रान्समध्ये विघातक कृत्य घडलं आहे. फ्रान्समधील अत्यंत व्यस्त असलेल्या रेल्वे मार्गावर जाळपोळ करण्यात आली आहे. यावेळी फ्रान्सच्या हायस्पीड ट्रेनच्या नेटवर्कला लक्ष्य करण्यात आलं.

सरकारी मालकीच्या रेल्वे ऑपरेटरने सांगितले की, जाळपोळ करणाऱ्यांनी पॅरिसला उत्तरेकडील लिले, पश्चिमेकडील बोर्डो आणि पूर्वेकडील स्ट्रासबर्ग या शहरांशी जोडणाऱ्या मार्गावरील रेल्वे मार्गांना लक्ष्य केले होते. त्यांनी सर्व प्रवाशांना त्यांचा प्रवास तात्पुरता रद्द करून पुढे ढकलण्याचं आवाहन केलं आहे. दुरुस्तीचे काम चालू होते, परंतु आता किमान शनिवार व रविवारही वाहतूक विस्कळीत असेल.

हेही वाचा >> ऑलिम्पिक परंपरेचा नवाध्याय! उद्घाटन सोहळा प्रथमच स्टेडियमऐवजी सीन नदीच्या पात्रात; खेळाडूंचे संचलन बोटीवर

काल रात्री, SNCF अटलांटिक, नॉर्दर्न आणि ईस्टर्न हाय-स्पीड लाईनवर तोडफोड झाली. आमच्या प्रतिष्ठानांचे नुकसान करण्यासाठी जाणीवपूर्वक आग लावण्यात आली”, असं SNCF ने एका निवेदनात म्हटले आहे. शुक्रवारी पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभाच्या आधी रेल्वे स्थानकांवर असा प्रकार घडल्याने भीती निर्माण झाली आहे.

जाळपोळीच्या पार्श्वभूमीवर ऑलिम्पिकमध्ये कडेकोट सुरक्षा

४५ हजाराहून अधिक पोलीस, १० हजारांहून अधिक लष्कर, २ हजार खासगी सुरक्षा रक्षण तैनात करण्यात आले आहेत. ऑलिम्पिक उद्घाटनात सुरक्षिततेसाठी फ्रान्स एक अभूतपूर्व शांतताकालीन सुरक्षा मोहीम राबवण्यात येत आहे. तसंच, स्नायपर्स छतावर आणि ड्रोनद्वारे पाळत ठेवणार आहेत. पॅरिस २०२४ ने सांगितले की ते परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी SNCF सोबत जवळून काम करत आहे.

परिवहन मंत्री पॅट्रिस व्हेरग्रीएट यांनी एक्सवर म्हटलंय की, अशा गुन्हेगारी घटनांचा आम्ही तीव्र निषेध करतो. वाहतूक पूर्ववत करण्यासाठी काम सुरू आहे. क्रिडा मंत्री अमेली औडे कॅस्टेरा यांनी सांगितलं की, ऑलिम्पिकसाठी खेळाविरुद्ध खेळणे म्हणजे फ्रान्सविरुद्ध, तुमच्याच कॅम्पविरोधात, तुमच्याच देशाविरोधात खेळणं आहे. या तोडीमागे कोण आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

सविस्तर बातमी अपडेट होत आहे