काश्मीरची खास ओळख असलेले कलम ३७० काढून टाकण्याविषयी कोणी ब्र उच्चारू शकत नाही, असा स्पष्ट इशारा पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या(पीडीपी) अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती यांनी देऊन एकप्रकारे भाजपला मागे रेटले. कलम ३७० मुळे जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा बहाल करण्यात आला आहे. काश्मिरी लोक अशा प्रकारच्या विधानांवर फार विश्वास ठेवणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपशी युती करून सत्तेत आलेल्या पीडीपीच्या कणखर भूमिकेसमोर भाजपनेही या वादग्रस्त विषयावर ‘जैसे थे’ राहणे पसंत केले.
मेहबुबा यांनी बऱ्याच मुद्यांना हात घातला. त्यात त्यांचे वडील आणि जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहंमद सईद यांनी काश्मीरमध्ये झालेल्या निवडणुकांचे श्रेय पाकिस्तान, हुरियत आणि अतिरेकी संघटनांना देऊन उधळलेल्या मुक्ताफळांचाही उल्लेख केला.
भाजप त्यांच्या पारंपरिक भूमिकेसंदर्भात मेहबुबा यांना विचारले असता त्या म्हणाल्या, एखाद्या पार्टीने त्यांची चूक कबूल करावी, असे मी म्हणत नाही, तर प्रत्येकाला जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा असल्याचे माहीत आहे. त्यामुळे हा दर्जा कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. दोन राष्ट्रध्वज आणि स्वतंत्र संविधान हे काश्मीरबाबतची वस्तुस्थिती असून यासंदर्भात बोलण्यास त्यांनी नकार दिला.
कलम ३७० काढून टाकण्याबाबत कोणीही ब्र उच्चारू शकत नाही
काश्मीरची खास ओळख असलेले कलम ३७० काढून टाकण्याविषयी कोणी ब्र उच्चारू शकत नाही, असा स्पष्ट इशारा पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या(पीडीपी)
आणखी वाचा
First published on: 06-03-2015 at 02:54 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article 370 cannot be touched says mehbooba mufti