देशाची आर्थिक प्रगती करण्यासाठी रिझव्र्ह बँक ऑफ इंडियाने व्याज दर वाढवावेत, त्याबाबतचे आपले मत स्पष्ट असून बँकेने सर्व घटक विचारात घेऊन हा निर्णय घ्यावा, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे. रिझव्र्ह बँक ऑफ इंडियाने व्याज दर मे महिन्यात भाजप सरकार आल्यानंतर दोन पत धोरणात जैसे थे ठेवले आहेत. तीन जून व ५ ऑगस्टच्या सायंकाळी आपण त्याबाबत स्पष्ट वक्तव्य केले होते. या मुद्दय़ावर रिझव्र्ह बँक ऑफ इंडियाने लवकर निर्णय घ्यावा. इतर घटकांचा व परिस्थितीचाही त्यात विचार करावा, असे त्यांनी रिझव्र्ह बँक ऑफ इंडियाच्या केंद्रीय मंडळाच्या कार्यक्रमानंतर वार्ताहरांना सांगितले.
५ ऑगस्टच्या पत धोरणानंतर जेटली यांनी म्हटले आहे, की चलनवाढ ही पुढेच जात आहे. त्यामुळे रिझव्र्ह बँक ऑफ इंडियाने तरलतेचा, चलनवाढीचा व आर्थिक वाढीचा विचार व्याज दर ठरवताना करावा असे आपल्याला वाटते.
जूनच्या पतधोरणाबाबत त्यांनी सांगितले, की सरकारला त्या वेळी गुंतवणुकीचे चक्र पुन्हा सुरू होण्याबाबत व उच्च आर्थिक वाढ व रोजगार निर्मितीबाबत चिंता होती. रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी सांगितले, की सध्या तरी किरकोळ चलनवाढ रोखण्यासाठीचे धोरण योग्य दिशेने आहे. रिझर्व बँकेची धोरणे ही काय नवीन माहिती येते त्यावर आधारित असतात.
रिझव्र्ह बँकेच्या मध्यवर्ती मंडळाने दोन आर्थिक वर्षांतील पाच टक्के वाढीच्या पाश्र्वभूमीवर जास्त आर्थिक वाढ, कमी चलनवाढ व शाश्वत बाह्य़ समतोल साधावा, असे आवाहन जेटली यांनी कार्यक्रमात केले. रिझव्र्ह बँक ऑफ इंडियाच्या निवेदनात म्हटले आहे, की चालू आर्थिक वाढ, जागतिक व देशांतर्गत आव्हाने व धोरणात्मक प्रतिसाद लक्षात घेऊन फेरआढावा घेण्यात येईल.
रिझव्र्ह बँकेने व्याजदर वाढवावेत
देशाची आर्थिक प्रगती करण्यासाठी रिझव्र्ह बँक ऑफ इंडियाने व्याज दर वाढवावेत, त्याबाबतचे आपले मत स्पष्ट असून बँकेने सर्व घटक विचारात घेऊन हा निर्णय घ्यावा..
First published on: 11-08-2014 at 12:41 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arun jaitley backs rbi rajan to take call on rate rejig